पान:पंढरीचा वारकरी.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ . गणतात.) ह्मणा जय जय विठ्ठल ! जय जय विठ्ठल ! पांडुरंग हरि, सांवळ्या पांडुरंग हरि. (असें भजन ते सर्व करूं लागले.) गृ०-ऐका, ऐका. मी तुझास विठोबाचें भजन करायास सांगितले नाही. मी इतकेंच विचारले की, पंढरीस येऊन तुकारामाचें नांव कां घेतां ? आतां वारकरी बावा, तुझी ह्या दिंडीचे पुढारी आहां असें मला वाटते. तर तुह्मी आपले टाळ घटकाभर बंद करून खाली बसा, व ह्या सर्व लोकां- सहि बसवा. मग आपण निवांतपणीं कांहीं बोलूं. (ते सर्व खाली बसतात.) वा०-तुझी कोठून आलां? गृ०-मी पुण्याहून आलों, पण मी तुझासारखा वारकरी नाही. वा०-वारी सर्वांच्याच दैवी कोठून असणार ? हा पूर्व- संचितांचा ठेवा. गृ०-तें कसेंही असो; पाहिजे तर त्याविषयी पुढे बोलूं. पण आता मला सांगा की, तुझी एथें कशाला आलां? वा०-देवाचे दर्शन व्यायाला. ०-