पान:पंढरीचा वारकरी.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२ तुकाराम जगद्गुरु होता. ( पुनः भजन चालवितात. ) ज्ञानदेव तुकाराम ! ज्ञानोबा तुकाराम ! ज्ञानदेव तुकाराम ! गृ० – दादांनो, इतके उतावळे होऊं नका. क्षणभर माझ्याशी बोला. तुमचें भजन तर सारा दिवस चाललेंच आहे. लो०- बोला, काय ह्मणतां ? गृ० - तुकाराम जगद्गुरु होता असें तुह्मी ह्मणतां, तर त्याच्या आज्ञेप्रमाणें तुह्मी कां चालत नाहीं ? माझ्या नांवाचे भजन करा असें त्यानें कोठें सांगितलें आहे ? लो०- आह्मां अडाण्यांस तुमच्या एवढें शहाणपण नाहीं, आमचा भोळाभाव सिद्धीस जाव. ( भजन ) ज्ञानबा तुकाराम ! ज्ञानोबा तुकाराम ! तुकाराम ! तुकाराम ! गृ० तुकारामाची भक्ति इतकी आवडते तर तुझी पंढरीस कां येतां ! देहूस जा, आणि रात्रंदिवस तेथेंच टाळ न वसा. लो०- ( एक धष्टपुष्ट मनुष्य पुढें होऊन मोठ्यानें पालतो) अहो, आह्मी पंढरीचे वारकरी आहों. आणि तुह्मी सांगतां तसेंच विठोबाचें भजन करितों. ह्मणा लोकहो, पुंडलिक वरदा हरिविट्ठल ! ( सर्व जण एकदम तसें ओरडून