पान:पंढरीचा वारकरी.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पंढरीचा वारकरी. भाग पहिला. कोणी एक गृहस्थ कार्तिकमासी पंढरपुरास गेला होता. तेथे कित्येक लोक चंद्रभागेच्या वाळवंटावर ज्ञानोबा तुका- राम, ज्ञानदेव तुकाराम, असें ह्मणून टाळ वाजवीत उभे होते, त्यांपाशीं हा गृहस्थ जाऊन ह्मणतो;- गृ० - अहो बाबांनो, हें काय करितां ? लो० - विठोबाचें भजन करितों, महाराज ! . गृ० - हें तर ज्ञानोबाचें भजन चाललें आहे. विठोबाला ह्याचा राग येणार नाहीं काय ? तुकारामानें विठोबाचें भजन केलें आणि तुह्मी तुकारामाचें भजन करितां हें कसें? तुकाराम जर ह्या वेळी एथें असता तर तो तुह्मास झणता ? त्याला हें तुमचें भजन आवडलें नसतें. त्य एक अभंग असा आहे की "भजन चाललें उफराटें । को जाणे खरें खोटें ॥ " त्याप्रमाणें तुह्मी करीत आहां. लो०- तुकोबाचें नांव घेतलें ह्मणजे विठोबास पावतें.