पान:पंढरीचा वारकरी.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ निघती की नाही? तुझी लवाडी सांगतां की नाही ? जोप- र्यंत ही पापें तुमच्यांत आहेत तोपर्यंत तुह्माला शांति कोठून मिळणार? वा०-ती पापें कोठून जाणार ? पाप जाईल तर ही काया सुवर्णाची होणार नाही? ह्या तर सांगायाच्या गोष्टी. आमचे मोठे साधु संत व शास्त्री पुराणिक आहेत त्यांचे पाप गेलें नाहीं; मग आमचे कुठून जाणार! कुत्र्याचे शेपूट

साहा महिने नळकंड्यांत घातले तरी तें वांकडें तें वांकडेंच. गृ०-मला वाटते तुझी आतां धोरणावर नसाल. उपा- साने व भजनाने तुमचे डोके तर फिरले नाही ना? मी तुझाला बोलायाच्या गोष्टी सांगत नाही. त्या गोष्टी ते बुवा तेथें ब्रह्मज्ञान सांगतात त्यांपाशी आहेत. माझ्या गोष्टी खऱ्या अनुभवाच्या आहेत. जो येशू खीस्तावर पूर्ण विश्वास ठेवितो त्याच्या सर्व अन्यायांची क्षमा होते, व देव त्याला आपला पवित्र आत्मा देतो मग त्याचे मन पालटते. तो जरी पहि- ल्याने वाघासारखा क्रूर असला तरी मेंढरासारखा नम्र होतो, व त्याच्या आत्म्याची काया खरोखर बदलती. त्याची कोळ- शासारखी काळी बुद्धि पालटून वर्फासारखी शुभ्र होती. तुह्मी ह्या गोष्टीचा अनुभव घ्या. वारीचे वेड सोडा, दग- .