पान:पंढरीचा वारकरी.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

mr . - तो जेथून आला तेथे झणजे आकाशांत गेला. त्या तार- णाराचें नांव येशू ख्रीस्त. त्याचे पुण्य अपार व अखंड आहे. तें जो कोणी विश्वास धरून मागतो त्याला देव देतो. वा०-तें तुह्मासारख्यास मिळेल. आझाला कोठून. मिळणार? गृ०-असें नाहीं. देवासमोर आपण सर्व सारखे पापी आहों. आणि येशूचें बोलावणे सर्वास आहे. तो ह्मणतो, "अहो कष्टकरी व ओझ्याने लादलेले, तुझी सर्व माझ्या जवळ या, झणजे मी तुझाला विसांवा देईन." विठोबा तुझाला क्षणभर तरी विसांवा देतो काय? वा०-कशाचा दादा विसांवा! हे पोट पाठीस लागलें आहे. आजचा दिवस गेला ह्मणजे उद्यांचा कसा जाईल अशी काळजी आहेच. गृ०-मी तुमच्या पोटाची गोष्ट बोलत नाही, कुत्रे देखील पोट भरते. जो मेहनत मजुरी करील तो उपाशी मरणार नाही. परंतु तुमच्या आत्म्यास शांति आहे काय हे मी विचा- रतो. तुह्मी आतां वारकरी झाला ह्मणून तुमचे दुर्गुण व दुष्ट स्वभाव गेले काय ? तुमच्या मनांत लोभ, हेवा, मत्सर, राग, कपट, वैर ही आहेत की नाहीत ? तुमच्या तोंडांतून शिवी .