पान:पंढरीचा वारकरी.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ - बरें व वाईट करवत नाही, तरी जो खरा देव आहे तो तुझास खचीत शासन करील. आणि तो कोणासही पाप- बुद्धि देत नाही. वा०-तर मग आमचा सत्यनाश होईल. गृ०-यांत काय संशय ? परंतु जर तुझी पश्चात्ताप करून त्याकडे फिराल तर तो तुह्मास क्षमा करील. वा०-त्याने आझास तारावें ह्मणून आह्मीं काय केलें पाहिजे? गृ०-तुमाला कांहीं करायास नको. ह्मणजे जसें तुझी आतां दानधर्म, तीर्थयात्रा, उपासतापास, भजनपूजन , करितां तसें तो कांहीं करायास सांगत नाही. हे सर्व व्यर्थ उपाय, तो तुह्मास सांगतो की, मी जे पुण्य देतों तें ध्या , जें व पुण्यवान व्हा. वा०-तें पुण्य आमी कसे घ्यावें ? गृ०-देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला प्रिय पुत्र या जगांत पाठविला. त्याने मनुष्यदेह धरून आमाकरितां पुष्कळ दुःख सोशिलें. आमच्या पापांचा भार उचलला. आणि पापामुळे में शासन, ह्मणजे मरण आझास भोगायाचें तें त्याने स्वतः भोगिलें. आणि मरून उठून पुनः -