पान:पंढरीचा वारकरी.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० . नाहीत. (गृहस्थाकडे वळून) दादा, त्याचे बोलणे जमेस धरूं नका. तुमची गोष्ट मला मानवली. तुझी काही खोटें सांगत नाही. पण आहीं विठोबाला सोडून कोणाला भजावें? आमचे वाडवडील ह्याचीच भक्ति करीत आले. तशीच आह्मीही करितों. गृ०-वाडवडिलांच्या चालीकडे पाहूं नये. धर्माच्या गोष्टींत ज्याचा त्याने विचार करावा, व देवाने लावून दिल्हेला मार्ग शोधून त्या मार्गाने चालावें. तुझी जर मनापासून माझी गोष्ट ऐकत असला, तर मी देवाच्या मार्गाची गोष्ट थोडक्यांत - तुह्मास सांगतों. . वा०-होय, मी तर मनापासून तुमची गोष्ट ऐकायास - कबूल आहे. भाग दुसरा. गृ०-आतां आपण परमेश्वराची प्रार्थना करून एक- चित्ताने त्याच्या मार्गाचा विचार करूं. (मग त्याने ईश्व- राची अशी प्रार्थना केली की, हे दयाळू देवा, आझा पाप्यां- वर दया कर, आणि आपला खरा मार्ग आह्मास दाखीव.) आतां ऐका. खरा व जीवंत असा एकच परमेश्वर आहे. हे तुह्मी कबूल करितां ?