पान:पंढरीचा वारकरी.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९ तसे विठोबास सजवून त्याच्या आंगावर डागडागिने घालतातं. आणि गरीब बिचारा वारकरी तोव्यांखाली बडविला जातो, पुष्कळ धक्या बुक्या खात जातो, अर्धमेला होतो तरी "घेतां विठ्ठलदर्शन दृष्टीस पडे कोरडा पाषाण," हेच काय तें त्याच्या पदरी पडते. याप्रमाणे विठोबाचें माहात्म्य आहे. अणखी दुसरें एक त्याचें माहात्म्य आहे. जत्रेच्या दिव- सांत जरीमरीच्या योगाने शेकडों मनुष्ये मरतात, लेंकरें उघडी पडतात, वायका विधवा होतात; आणि ही जरीमरी यात्रा फुटली झणजे गांवोगांव पसरून हजारों लोकांचा प्राण घेती. केवढे हे विठोबाचें माहात्म्य ! जे लोक त्याच्या दर्श- नास कष्टाने व भावार्थाने येतात त्यांची तो अशी दशा करितो. अशा यात्रा सरकार बंद करील तर किती बरे होईल! हजारों जणांचे जीव वांचतील. एक वारीकरी (रागावून ह्मणतो.) एकूण तुमच्या बोल- ण्याप्रमाणे आह्मी व हे सगळे जग वेडे, तुझी काय ते शहाणे. तुमच्यापाशी काय ज्ञानाची पुंजी आहे ती आह्मास दाखवा बरें? दुसरा वारकरी (त्यास ह्मणतो.) अरेरे, इतका तापून कां बोलतोस ? ते दादा आपल्यास काही वावगें सांगत .