Jump to content

पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सहभागी करुन घेतलं. त्यांन त्यांच्या जबाबदारीची जाणीव झाली. प्रकल्प सुरु होताना आमच्याकडे बालविवाह होतच नाहीत असं म्हणणारे आता हा कसा गंभीर प्रश्न आहे, असं म्हणू लागले.
 शिरुर बदलताना पाहणं हे वेगळं समाधान असल्याचं शैलाताई सांगतात. मोठी माणसं बदलतील, कदाचित त्यांना वेळ लागेल पण मुली मात्र वेगाने बदलत आहेत. स्वत:चं आयुष्य कसं असायला हवं ते ठरवण्यासाठी त्या आग्रही आहेत. त्यांना शिकायचं आहे, कुटुंबाला हातभार लावायचा आहे. दष्काळग्रस्त शेती आणि ऊसतोडणीच्या कष्टांतून आई-वडिलांना बाहेर काढायचं आहे. शिरुरच्या मुली स्वप्नं बघू लागल्यात आणि त्या पूर्ण करण्याच्या वाटेवर आम्ही त्यांना आणू शकलो, याचं समाधान मोठं असल्यांचं शैलाताई सांगतात.