लोकांना उत्तर देण्यासाठी अभियानाने एक ७३ नावांची यादीच सादर केली. यात लग्न ठरलेल्या अल्पवयीन मुलींच्या नावांचा समावेश होता. यातल्या मुली आणि मुलांच्या पालकांना वर्षाताई, शैलाताई प्रत्यक्ष भेटल्या. त्यांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला.अगदीच ऐकलं नाही त्यांना कायद्याचा धाक दाखवला. काही लग्नाच्या पत्रिका आधीच छापून तयार होत्या. काही ठिकाणी लग्नाची खरेदी पूर्ण झाली होती. एका लग्नात तर मांडवही घातला होता. गावातल्या नेते मंडळींच्या भेटी घेऊन त्यांना समजावलं. त्यांनी मध्यस्थी केली. बाल विवाहांत गावातल्या नेतमंडळींनी भेटी घेऊन त्यांना समजावलं. त्यांनी मध्यस्थी केली. बाल विवाहांत गावातल्या नेतमंडळींनी हजेरी लावू नये, अशी विनंतीही करण्यात आली. त्यानी ती मान्यही केली. शैलाताई एक प्रसंग सांगतात. एक बालविवाह होताय असं कळल्यावर तिथं सगळी टीम पोहोचली. मुहूर्त जवळ आला होता. मंडप भरलेला होता. तणावाचं वातावरण तयार झालं. मुलीचा शाळेचा निर्गम उतारा पहिला तर दोनच दिवसांपूर्वी त्या मुलीला १८ वर्षे पुर्ण झाली होती. मग लग्न लावून वधूवरांना आशीर्वाद देऊनच बाहेर पडावं लागलं. असे प्रसंग घडले तरी प्रयत्न सुरुच राहिलं. या यादीतली बहुतांश लग्नं रोखण्यात यश आलं. पण त्यातले २० विवाह रोखता आले नाहीत. लोक गावाच्या बाहेर, एखाद्या देवस्थानावर जाऊन गुपचूप लग्न उरकत. काही तर जिल्ह्याबाहेर जात. पोलिस यंत्रणा कामाला लावूनही त्यांचा पाठपुरावा करणं अवघड होतं. ज्यांचं लग्न थांबलं यातल्याच काही मुली स्वत:हून कौशल्य प्रशिक्षण घ्यायला तयार झाल्या. काही मुलींना घरी जाऊन पालकांशी चर्चा करुन तयार कारावं लागलं. प्रश्न होता ज्यांच लग्न झालं होतं. त्यांचा. वय १८ पेक्षा कमी असलेल्या अशा अनेक बालवधू शिरुर तालुक्यात होत्या. कायद्याचा बडगा दाखवून विवाह अवैद्य ठरवले असते तर मुलींना तिच्या कुटुंबाला समाजात वावरणं अवघड झालं असतं. अशा वेळी वर्षाताई आणि शैलाताईंनी मधला मार्ग काढला या मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं, त्यांच्यावर इतक्यात मातृत्वाची जबाबदारी पडणार नाही, हे पाहणं, त्यांना कौशल्य प्रशिक्षण देणं असे मार्ग काढले. विवाहित मुलींच्या सारसच्या मंडळींशी, त्यांच्या पतीशीही बोलावं लागलं. त्यांच प्रबोधन केल्यावर अनेकजण तयार झाले. त्यातल्या काही कौशल्य प्रशिक्षणासाठी आल्याही प्रकल्पाच्या अखेरीस जनसुनावणी घेण्यात आली. बालहक्क आयोगाने बालविवाहांच्या घटनांबाबत सुमोटो दाखल करुन घेऊन गंभर दखल घेतली. गावागावात बालसंरक्षण समित्या फक्त नावालाच नेमल्या होत्या. वर्षाताई आणि शैलाताई यांनी गावागावांत जाऊन ग्रामसभेत
पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/66
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे