पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-GCC *

  • 555

संघर्षाच्या शिलेदार अॅड. शैला जाधव - ... .....लेक लाडकी अभियानाने आजवर केलेले अनेक संघर्ष कधी व्यवस्थशी होते. तर कधी सरकारी यंत्रणेशी होते पण शिरुरमध्ये वेगळंच काही साध्य करायचं होतं. अॅड. शैला जाधव यांनी सहाकाऱ्यांच्या सोबतीनं नेहमीच्या जिद्दीने ते करुन दाखवलं अॅड. शैला जाधव या — लेक लाडकी अभियानातलं जुनं जाणतं नाव. अनेक चळवळी आणि संघर्षामधल्या त्या आघाडीच्या शिलेदार. शिरुर तालुक्यात किशोरी गटातील मुलींसाठी काम करायचं ठरलं तेव्हा ठरलेला वयोगट होता. ११ ते १९ प्रत्यक्ष मुलींच्या भेटीगाठी सुरु केल्या तेव्हा लक्षात आलं, १८ वर्षांवरील मुली कमी आहेत. कारण स्पष्ट होतं. बहुतांश मुलींची लग्न झालेली होती ! या परिसरातील बालविवाहाच्या समस्येला सुरुवातीलाच सामोरं जावं लागलं ते हे असं. लग्न झालं असतलं तरी याही किशोरीच होत्या आणि त्यांच्या समस्या अधिक गंभीर होत्या. त्यामुळे त्यांना या प्रकल्पात सहभागी करुन घ्यायचं ठरलं. मुलींना एकत्र करुन एक किशोरी मेळावा घेतला. तो प्रचंड यशस्वी झाला. यावेळी लेक लाडकी अभियानाने बालविवाहाच्या विरोधात थेट भूमिका मांडली आणि मुलींचे विवाह सज्ञान होण्यापूर्वी करणं चुकीचं असल्याचं ठामपणे मांडलं. बालविवाह ही सामान्य बाब आहे असे समजणाऱ्या समुहासमोर प्रकल्पाला सुरुवात करतानाच हे मांडणं हे खूप धाडसांच होतं असे शैलाताई सांगतात. __ मेळावा यशस्वी झाला होता, कामही प्राथमिक पातळीवर सुरु झालं होतं. पण त्याच वेळी काही स्थानिक लोकांनी वेगळीच भूमिका घेतली. आमच्या तालुक्यात बालविवाह होतच नाहीत असा त्यांचा दावा होता. हे बाहेरुन आलेले लोक नसलेले प्रश्न निर्माण करत आहेत असं त्यांच म्हणणं होतं. या

29