पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-GC * कलावंत कार्यकर्ता कैलास जाधव ... ...... चळवळीत काम करताना वेगवेगळी कला माध्यम गरज ओळखून कल्पकतेने वापरली की त्यांचा परिणाम खूप मोठा असतो. कैलास जाधवने शिरुरमध्ये हेच केलं. ... . .. 'लेक लाडकी अभियाना'चा कैलास जाधव हा जुना कार्यकर्ता. शाहिरी पठडीतला खणखणीत आवाज. अनेक वाद्यांवर हुकूमत आणि पथनाट्यांसारख्या माध्यमांत अनेक प्रयोग केलेला हा कलाकार. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा परिणामकारक वापर शिरुर तालुक्यातील किशोरींसाठीच्या प्रकल्पासाठी करणं गृहीतच होते. हा प्रकल्प सुरु णाला तेव्हा या भागातल्या बालविवाहाच्या समस्येचं गांभीर्य समोर आलं. कैलासने त्या विषयावर लघुपट तयार करायचं ठरवलं. कथा, पटकथा त्यानेच लिहिली. वडील आपल्या शाळकरी मुलीचं लग्न तिच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या असलेल्या पुरुषासोबत लावतात. नंतर तिची आज या मुलीच्या पाठीशी उभी राहते आणि तिची या लग्नातून सुटका करते. तिची शाळा पुन्ह सुरु होते. अशी ती गोष्ट आहे. मुलीच्या वडिलांची भूमिका कैलासने स्वत: केली होती. आजीच्या भूमिकेत वर्षाताई होत्या. हा लघुपट घेऊन ते शिरुरमध्ये गेले. आधी काही गावांत स्वत: जाऊन तो दाखवला. पडद्यावरची माणसं समोर दिसतात. याचं लोकांना अग्रुप वाटायचं. तो विषय, त्यातली पात्रं लोकांना प्रचंड जवळची वाटायची. लघुपट पाहताना अनेकदा लोकांच्या डोळ्यांत पाणी यायचं. लोक या विषयावर चर्चा करायचं नंतर रिक्षामधून टिव्ही संच, जनरेटर नेऊन गावोगावी, शाळांमध्ये हा लघुपट दाखविला गेला. रिक्षावर लेक लाडकी अभियानानं बॅनर लावलेलं असायचं. टुरिंग थिएटरसारखा गावोगावी हा लघुपट पोहोचला. तालुक्यात या लघुपटाचे २०० हुन जास्त प्रयोग झाले. बालविवाहाच्या प्रश्नावर मतपरिवर्तन करण्याच्या प्रक्रियेत हा लघुपट सात

529 -५४