पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-GCC * संपर्काची साखळी रुपाली मुळे ... ...... लेक लाडकी अभियानाचे कार्यालय आहे साताऱ्यात आणि प्रकल्प होता बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात प्रकल्पाच्या संपर्क प्रमुख म्हणून रुपाली मुळे यांनी हे अंतर कमी करण्यात यश मिळवलं ! - ... ...... शिरुर तालुक्यात ५३ ग्रामपंचायती आणि ९६ गावं आहेत. त्यातली अनेक दुर्गम. या सर्व गावांत किशोरवयीन मुलींसाठी प्रकल्प राबवायचा होता. आरोग्य विभागाच्या मदतीने मुलींच्या याद्या आधीच हातात होत्या. त्यामुळे कोणत्या गावात किती मुली आहेत ही माहिती हाताशी होती. प्रत्यक्ष काम सुरु करण्यापूर्वी या सगळ्यांना एकत्र भेटावं म्हणून एक मेळावा घ्यायचं ठरलं. रुपा मुळे या प्रकल्पात संपर्क प्रमुख म्हणून काम करणार होत्या. या याद्या त्यांच्या हाती पोहोचल्या. आशा सेविका या संपूर्ण प्रकल्पाच्या कणा होत्या. त्यांच्या माध्यमातून मुलींपर्यंत पोहोचायचं होतं. मुलींचे फोन नंबर आणि पत्ते त्या-त्या गावातल्या आशा सेविकांकडून मिळाले. रुपा ताईंना त्यापूर्वी आशा सेविकांची एक बैठक घेतली आणि त्यांची प्रकल्पातली भूमिका समजावून दिली. आशा सेविकांचं पहिलं काम होतं गावात किशोरीचे गट तयार करणं. मुली उत्साहाने एकत्र आल्या. त्यांना आपल्याला गटांना कल्पकतेनं नावं ठरवली. किशोरी मेळाव्यासाठी रुपा ताईंनी मुलींना फोन केले. कणीतरी आपल्याला फोन करुन कार्यक्रमाला निमंत्रित करतेय ही कल्पनाच मुलींना सुखावून गेल्याचं रुपाताई सांगतात. या मेळाव्यासाठी सगळी तयारी साताऱ्याहन केली गेली होती. लागणारं सहित्य भरुन गाड्या पोहोचल्या होत्या. मुलींना फोन तर केला होते. पण प्रत्यक्षात काय होणार ही धाकधूक होतीच. कार्यक्रमाची वेळ झाली. भला मोठा मंडप घातला होता. मुलींच्या संख्येच्या हिशेबाने अल्पोहार आणून ठेवला होता. सुरुवातीला अगदीच चार-दाने मुली मंडपात दिसत होत्या. रुपाताईंचा धीर सुटू लागला होता. पण थोड्याच वेळात मुली गटागटाने येऊ लागल्या. त्या इतक्या संख्येने आल्या SC

  • 09