पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गजाआड झाले. त्यामुळे इतरांनी आपले उद्योग बंद केले. त्याच दरम्यान सरकारने गर्भवतींचे ट्रॅकिंग (एएनसी) ठेवणे सुरु केले. त्यामुळे परिस्थिती हाताळणे सोपे झाले. यानंतर डॉ. तांदळे यांनी शिरुर तालुक्यातील कोणाही गर्भवतीने गर्भपात केल्याचे समोर आले तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित वैद्यकीय व्यवसायिकावर राहील आणि याचे गंभरपणे रिपोर्टिंग केले जाईल. असे खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना बजावले तशी पत्रेच पाठवले. त्यातून योग्य तो बोध घेतला गेला. लोकांच्या विचारांमध्येही बदल झाला. कायद्याचा धाक, जनजागृती यामुळे गेल्या काही वर्षांत मुलींचे लिंगगुणोत्तर सातत्याने वाढते आहे. सध्या ते हजार मुलग्यांमागे ९२६ मुली एवढे आहे. हा बदल घडवण्यात डॉ. तांदळे यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला आहे. यासाठी डॉक्टरांनी गावागावात जाऊन बैठका घेतल्या. लोकांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबात लागोपाठ मुलीच असतील तर अशा कुटुंबांना समजावणं, मुली मुलांपेक्षा कुठेही कमी नसतात. हे पटवून देणं हे काम सातत्याने करावं लागलं.
  'लेक लाडकी अभियाना'शी डॉक्टरांचा पुन्हा संपर्क आला तो किशोरवयीन मुलींसाठी त्यांनी पुन्हा काम सुरु केले तेव्हा. केवळ कायद्याचा बडगा दाखवून उपयोग नव्हता. मानसिकता बदलावी लागणार होती. तालुक्यात काम उभं करण्यासाठी एक मजबूत साखळी तयार करण्याची गरज होती. अभियानाने तालुक्यातील अशा सेविकांची मदत घ्यायचे ठरवले. त्यांना काही मानधनही द्यायचे ठरले. त्यामुळे बहुतांश अशा सेविका यासाठी तयार झाल्या. गावात चांगला संपर्क असल्याने त्यांच्याकडून काम करुन घेणे सोपे होणार होते. समुपवदेशन, आरोग्य, प्रशिक्षण यासाठीही त्यांचा उपयोग झाला. बालविवाह रोखण्यासाठी त्यांची अप्रत्यक्ष मदत झाली. या प्रक्रियेत डॉक्टरांनी मोठे सहकार्य दिले.
 तालुक्यात बालविवाहांचं प्रमाण मोठं आहे. या मुलींना लग्नानंतर येणारे प्रश्न डॉक्टर अनेक वर्षे जवळून बघतात. १८ वर्षांच्या आत लग्न झालं की मुलीची वाढ खुंटली. हाडं ठिसूळ होतत. कमी वजनाची, अपुऱ्या दिवसांची, कुपोषित, व्यंग असलेली मुलं जन्माला येतात. अॅनेमिया तर ठाण मांडून बसतो. पण तोवर खूप उशीर णालेला असतो. लैगिंक अरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. हे सगळं टाळायचं असेल तर बालविवाह रोखण्याची गरज होती. डॉक्टर खंबीरपणे अभियानासोबत राहिले. जनजागृती प्रशिक्षण कार्यक्रम यात साथ दिली.
 खरं तर डॉक्टर स्वतः एका सुखवस्तु, सुशिक्षित कुटुंबाची पार्श्वभूमी