Jump to content

पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-GCCE* आरोग्यरक्षक आणि समाजसेवकही C डॉ. राजेश तांदळे -० तालुक्याचे आरोग्य अधिकारी म्हणून काम करताना डॉक्टरांना तालुक्यातील सामाजिक वास्तवाची चांगलीच जाणीव होती. त्यामुळे किशोरींसाठीच्या प्रकल्पांत त्यांनी संपूर्ण सहकार्य केलंच शिवाय स्वत: जातीने सहभागही नोंदवला. प्रकल्प यशस्वी होण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. -... ...... अॅड. वर्षा देशपांडे यांच्याशी डॉ. राजेश तांदळे यांचा संपर्क आला तो थोड्या वेगळ्या परिस्थितीत. २०१० च्या जनणगणनेचे आकडे जाहीर झाले होते बीडमधील शिरुर हा मुलींचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक खालावलेला तालुका म्हणून समोर आला होता. डॉ. तांदळे तेव्हाही शिरुरचे आरोग्य अधिकारी होते. ते जेव्हा बीडला आरोग्य अधिकाऱ्यांच्या शासकीय बैठकींना जात, तेव्हा शिरुरचा खालावलेल्या लिंगगुणोत्तराबाबत उल्लेख होई. डॉक्टरांना ते अत्यंत अपमानास्पट वाटे. वर्षाताईंनीही याच मुद्द्यावर तालुक्यात काम सुरु केले होतं. लिंगनिवड चाचण्या आणि त्यानंतर होणारे गर्भपात यात आरोग्य विभाग तर कुठे जबाबदार नाही ना याबाबत त्यांनी तालुक्यात काही ठिकाणी चौकशीही केली होती. थोड्या साशंकतेनेच त्या डॉ. तांदळे यांना भेटल्या होत्या. मात्र, या भेटीतून बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या. वर्षाताईंसमोर एक संवे दनशील व्यक्ती या भेटीतून उलगडली. डॉ. तांदळे यांनी त्या आधीच स्वत:च तालुक्यातील मुलींचे लिंग गुणोत्तर वाढवण्याचा मुद्दा मनावर घेतला होता. त्यात त्यांना 'लेक लाडकी अभियाना'ची साथ मिळाली. डॉ. तांदळे यांनी याबाबत थोडा अभ्यासही केला. तालुक्यातील बहुतेक लोक ऊसतोडसाठी स्थलांतर करतात. लोक शिरुरच्या बाहेर जाऊन लिंगनिदान चाचण्या आणि गर्भपात करत असणार, हे स्पष्ट होते. या दरम्यान लेक लाडकी अभियानाने बीड जिल्ह्यात काही स्टिंग ऑपरेशन केली. त्यातून अनेक नामवंत डॉक्टर लेक लाडकी अभियान संयुक्त राष्ट्र संघ लोक सरख्या तिथी

  • 09