पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

  मुलीही माणूस आहेत आणि त्यांनाही शिकण्याचा, आरोग्याचा आणि स्वत:च्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा हक्क आहे, हे विचार अभियानाच्या माध्यमातून शिरूरमध्ये पहिल्यांदा रुजले. त्या रुजवणीत महत्वाची भूमिका बजावता आली याचा मनापासून आनंद असल्याचं सिस्टर सांगतात.