Jump to content

पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बालविवाहांच्या प्रश्नावर काम करण्याचे ठरले. त्यावेळी सिस्टर आरोग्य विभागाच्या सेवतेतून नुकत्याच निवृत्त झाल्या होत्या. हाताशी वेळ होता आणि समाजासाठी काही तरी करण्याची तळमळ, सिस्टर अभियानासोबत जोडल्या गेल्या आणि त्यांच्यावर शिरुर तालुक्याच्या मुख्य समन्वयक म्हणून जबाबदारी आली.
 शिरुर हा दुष्काळी तालुका, शेती मुख्यत: जिरायती. तालुक्यात जलप्रकल्प नाहीत. उद्योग नाहीत. पाऊस अत्यंत कमी. त्यामुळे दुष्काळ पाचवीला पुजलेला. तालुक्यातले लोक पोट भरायला साखर कारखान्यांच्या परिसरात ऊस तोडायला जातात. सहा महिने घर, गावांपासून दूर. शाळकरी मुलांच्या शिणिाचे हाल. त्यात मुली असतील तर घरी एकटे ठेवणे किंवा ऊसतोडीला सोबत घेऊन जाणे दोन्ही असुरक्षित. वयात आल्या की मुलींची लग्न ससस लावून दिली जातात. त्यामुळे तालुक्यात बालविवाहांचं प्रमाण प्रचंड आहे. नेमक्या याच समस्येवर अभियानासोबत काम करायचे होते इतकी वर्षे आरोग्य क्षेत्रात काम केल्यामुळे बालविवाहांचे मुलींच्या आरोग्यावर किती गंभीर परिणाम होतात. हे सिस्टर जवळून बघत होत्या. लैगिंक शोषण आणि हिंचाराचा मुद्दाही सोबत होताच. अभियानासोबत काम करताना या सगळ्याचा साकल्याने विचार करायचा होता.
 नोकरीतील १० ते ११ वर्षे एवढा दिर्घकाळ सिस्टर शिरुर तालुक्यात काम करत होत्या. कामामुळे तालुक्याच्या कानाकोपऱ्यात त्यांचा प्रवास झाला आहे. प्रत्येक गावात त्यांचा संपर्क आहे. लोकांना मदत करण्याचा त्यांच्या अडीअडचणीला धावून जाण्याचा स्वभाव असल्याने लोकांमध्ये त्यांच्याविषयीचा जिव्हाळा निवृत्तीनंतरही कायम राहिला आहे.
 'लेक लाडकी अभियाना'ने शिरुर तालुक्यातील बालविवाहांचा प्रश्न हाती घेतला तेव्हा तालुक्यातील अशा सेविकांना या अभियानात सामील करुन घेण्याचे ठरले. या निर्णयामुळे ठोंबरे सिस्टर यांचा उत्साह वाढला. कारण अशा सेविका राज्या सर्वप्रथम सेवेत आल्या तेव्हा २०१६ मध्ये तालुक्यातील अशा सेविकांना ३३ दिवसांचे प्रशिक्षण त्यांनी दिले होते. त्यातल्या बऱ्याच जणी आताही सेवेत असल्याने त्याच्यासोबतचे काम अधिक सोपं होणार होतं.
 शिरुर तालुक्यात एकूण १२८ अशा सेविका आहेत. त्यापैकी १२० सेविकांनी या प्रकल्पात सहभागी व्हायचे ठरवले. हा प्रकल्प मुख्यतः किशोरीसाठी होता. तालुक्यात एकूण ६९४७ किशोरी होत्या त्यापैकी २५०० मुलींना यात सहभागी करून घ्यायचे ठरले. याद्या तयार झाल्या. ९६ गावांच्या