पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Gec

आरोग्य ते सेवा ते समाजकार्य शंकुतला ठोंबरे ... . ...आरोग्य विभागात प्रदीर्घ सेवा करुन त्या निवृत्त झाल्या. पण निवृत्तीनंतर त्या स्वस्थ बसल्या नाहीत आपले ज्ञान आणि दांडगा जनसंपर्क याचा उपयोग करत किशोरींच्या आयुष्याला नवं वळण देणाऱ्या प्रकल्पामध्ये त्या शिरुर तालुक्याच्या मुख्य समन्वयक झाल्या आणि हा प्रकल्प यशस्वी करण्यात मोलाचा सहभाग दिला. - ... ... .... त्यांच नाव शकुंतला ठोंबरे. पण शिरुर तालुक्यात त्या प्रसिध्द आहेत ते ठोंबरे सिस्टर या नावाने. २०१० -११ मध्ये जणगणनेचा अहवाल प्रसिध्द झाला आणि त्यात जाहीर झालेल्या आकडेवारीमुळे शिरुर तालुका राष्ट्रीय नकाशावार आला. ते एका नकारात्मक गोष्टीसाठी ! तालुक्यातील ० ते ६ वयोगटातले लिंगगुणोत्तर धोकादायक पातळीच्या खाली आलं होतं. अॅड. वर्षा देशपांडे त्यावेळी शिरुरला सातत्याने भेट देत होत्या. आरोग्य विभागाची सतत संपर्कात होत्या. जनजागृती, पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी यावर काम सुरु होते. बीड शहर, परळी आणि परिसरात तनी काही स्टिंग ऑपरेशन केली होती आणि बडे डॉक्टर गजाआड केले होते. त्यामुळे त्यांच्या नावाची बीड जिल्ह्यात चांगलीच दहशत होती. त्यावेळी ठोंबरे सिस्टर शिरुर तालुक्यात आरोग्य विभागात बीएनओ म्हणून काम करत होत्या. या दरम्यान लेक लाडकी अभियानाने मुलींचे तालुक्यातील लिंग गुणोत्तर कमी होण्याची कारणे शोधण्यासाठी तालुक्यात एक सर्वेक्षण केले होते. आरोग्य विभागाच्या वतीने तेव्हा सिस्टर या कामात सहकार्य करत होत्या. हा त्यांचा अभियानाशी असलेला पहिला संपर्क. त्यानंतर आरोग्य विभाग, लेक लाडकी अभियान या सगळ्यांच्या प्रयत्नांमधून शिरुर तालुक्यातील मुलींचे लिंग गुणोत्तर वाढले ते आता जवळपास सामान्य पातळीवर आले आह ! २०१६ मध्ये 'युएनएफपीए' च्या सहकार्याक़ने शिरुर तालुक्यातील