Jump to content

पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-

परिवर्तनाचा वाहक अयाज इसाक शेख (बाबू) - ... ... ...शिरुरमध्ये रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या बाबूला लेक लाडकी अभियानासाठी रिक्षा चालवण्याचे काम मिळाले बाबू अभियानाचे लघुपट दाखवत, मुलींना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहाचवत रिक्षाचालकाचा कार्यकर्ता कधी झाला, ते त्यालाही कळले नाही. बाबूची रिक्षा शिरुरमधली एकमेव. मुलांना शळेत सोडायला, रुग्णांना दवाखान्यात न्यायला किंवा पाहण्यांना बस स्थानकावर सोडायला शिरुरमधल्या लोकांना बाबूच्या रिक्षाशिवाय पर्याय नाही. रिक्षा आहे दुसऱ्याच एकाच्या मालकीची, पण बाबू ती अर्ध्या वाटणीत चालवायचा. __ अभियानाशी त्याचा संपर्क आला तो ठोंबरे सिस्टर यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबातल्या मुलांना बाबू शाळेत सोडायचा. त्याचा प्रामाणिकपणा आणि सुरक्षित गाडी चालवण्याचं कौशल्य त्यांनी पाहिलेलं होतं. त्यामुळे अभियानाच्या कामादरम्यान तालुक्यात प्रवास करण्यासाठी एक वाहन हवे आहे, असे कळले तेव्हा आपसूकच बाबूचे नाव समोर आहे. शिरुरमध्ये अभियानाने प्रामुख्याने बालविवाहांचा प्रश्न हाती घेतला होता. लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी म्हणून अभियानानेच तयार केलेला 'दफ्तर' हा लघुपट दाखवण्याची जबाबदारी बाबूवर टाकण्यात आली. एका मुलीचे वडिलांच्या जबरदस्तीमळे तिच्यापेक्षा वयाने कितीरी मोठ्या असलेल्या माणसाशी लग्न लावण्यात येते. पण नंतर तिची आजी तिच्यामागे खंबीरपणे उभी राहते आणि मुलीची त्यातून सुटका होऊन तिच्या हाती पुन्हा शाळेचे दफ्तर येते, अशी त्या लघुपटाची गोष्ट आहे. __ बाबूला एका पेन ड्राईव्हमध्ये तो लघुपट दिलेला होता. रिक्षात सोबत एक टिव्ही असायचा. शिरुरमध्ये विजेचा लपंडाव सुरु असतो. म्हणून एक इन्व्हर्टरही सोबत दिला होतात. बाबू रिक्षा घेऊन गावोगावी जायचा. शक्यतो संध्याकाळची वेळ निवडलेली असायची. गावातले लोक शेतातून कामावरून