समजावला. लहान मुलांसमोर एखादं नव खेळणं ठेवल्यावर जसा आनंद होतो, तशा मुली संगणक हाताळताना खुश व्हायच्या. जादूच्या पेटीतून वेगवेगळ्या गोष्टी बाहेर पडाव्यात तसं त्यांना नवनव्या गोष्टी शिकताना व्हायचं.
मुलींना फोटोशॉप शिकताना विशेष मजा आली. अमोल यांनीही स्थानिक गरजांचा विचार करुन त्यांना ते शिकायला प्रोत्साहन दिलं. बीडमध्ये सतत राजकीय घडामोडी सुरु असतात. त्यामुळे फ्लेक्स, बोर्ड लावणं हे सतत सुरु असतं. मुलींच्या फोटोशॉपच्या ज्ञानाचा उपयोग त्यांना होऊ शकेल असा विचार त्यामागे होता.
हा कोर्स मुलींनी उत्साहाने पूर्ण केला. तो संपला तरी नंतर पॅक्टिसही महत्त्वाची असते. घरात हाता-तोंडाची जेमतेम गाठ पडत असताना कम्प्युटर कुठून असणार ? मुली नंतर हवे तेव्हा क्लामध्ये यायच्या, सराव करायच्या. आताही त्या येतात. क्लासमध्ये पाणी वगैरे भरुन ठेवलेलं असतं. कधी त्याची बस यायला वेळ असतो. कधी डबा खायचा असतो. क्लास मुलींना आपला वाटतो. अमोल यांनी प्रशिक्षण दिलेल्या मुलींपैकी दोघी शिरूरमध्येच एका डीटीपी केंद्रात काम करतात. थोडेफार पैसेही मिळवतात. या सगळ्याच मुली अद्याप शिक्षण घेताहेत. पण शिकता शिकताही काम करुन थोडेफार पैसे मिळवता येतात हा आत्मविश्वास त्यांना मिळाला आहे. स्वावलंबनाचा किबोर्ड त्यांच्या हाती आलाय.
पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/48
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे