पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-GC

स्वावलंबनाचा किबोर्ड अमोल ढाकणे - ... ...... संगणक मुलींसाठी शाळेत दुरुन बघण्याची वस्तू होती. अमोल यांनी मुलींची संगणकाची दोस्ती करुन दिली. आता मुली तो आत्मविश्वासाने हाताळताततच. शिवाय काही जणी त्यातून अर्थार्जनही करु लागल्या आहेत. -... . .. अमोल ढाकणे यांच्या आई शोभा लेक लाडकी अभियानाशी जोडलेल्या होत्या. त्यामुळे अमोल यांना अभियानाविषयी माहिती होती. अभियानाच्या वतीने शिरुर तालुक्यात किशोरवयीन मुलींसाठी कौशल्य विकास कार्यक्रम घ्यायचे ठरले तेव्हा त्यात एक संगणक प्रशिक्षण असाही कोर्स होता. त्यावेळी अमोर बीडमध्ये काम करत होते. तालुक्यातील मुलींची गरज आणि कामाचं महत्तव ध्यानात घेऊन त्यांनी शिरुरला येऊन अभियानाच्या कामाशी जोडून घ्यायचं ठरवलं. संगणक प्रशिक्षण तालुक्यातील मुलींच्या दृष्टीने खूप महिने ऊसतोड कामगार म्हणून स्थलांतर करतात. संगणक शाळेत सक्तीचे केले तरी शाळांमध्ये या शिक्षणाची अवस्था वाईट आहे. अनेक ठिकाणी संगणक बिघडलेले असतात. कधी प्रशिक्षक नसतो. कधी विजेचा प्रश्न तर कधी आणखी काही. बऱ्या आर्थिक स्थितीतली मुले खासगी क्लास लावू शकतात. या मुलींना ते शक्य नसतं. बाहेर कोणत्याही क्षेत्रात गेलात तरी संगणकाचे थोडेफार ज्ञान गरजेचे असते. त्यामुळे हे प्रशिक्षण घेऊन मुलींना त्या क्षेत्रातले मूलभूत ज्ञान मिळावे आणि त्यांनी रोजगारासाठी तयार व्हावे असा हेतू होता. ___ मुली आल्या तेव्हा त्यांना संगणक सुरु कसा करायचा इथपासून शिकवावे लागले. पण मुली जिद्दीने शिकल्या. संगणकावर टायपिंग शिकवण्याला प्राधान्य दिले. आठवड्यातले काही दिवस फोटोशॉप शिकवण्यासाठी वापरले. यंत्र म्हटले की मनात उगाच एक भीती असते. ग्रामीण भागात तर घरात अशी यंत्रे नसल्याने ती असतेच. मुलींना असे दडपण येऊ नये म्हणून अमोल यांनी मुलींसाठी एक संगणक उघडूनच ठेवला होता. त्यातल्या भागांची माहिती दिली. त्यांनी मुलींना सॉफ्टवेअर, हार्डवेअर यातला फरक whlotomamichan