पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-GGCC *

व्यक्तिमत्व विकासाचा मंत्र प्रिया चव्हाण प्रिया राहते साताऱ्यात. तिचे तिथे ब्युटी पार्लर आहे ती पार्लर आणि व्यक्तिमत्व विकासाचे क्लासेसही घेते. नेहमीच्या पार्लर प्रशिक्षणापेक्षा वेगळे असलेले तिचं हे काम अॅड. वर्षा देशापांडे यांच्या बघण्यात होतं. शिरुरमध्ये किशोरवीयन मुलींसाठी काम सुरू करण्याचा विचार झाला तेव्हा प्रियाचं नाव आपसूकच पुढे आलं. –... .... प्रशिक्षण देण्यासाठी साताऱ्यातून शिरुरला जावं लागणार होतं. साताऱ्यातले क्लासेस, पार्लर सोडून काही काळासाठी का होईना दूर राहावं लागणार होतं. वर्षाताई तिला म्हणाल्या, 'काम करायचं की नाही हे ठरवण्यापूर्वी एकदा बीडला येऊन मुलींशी बोल.' प्रिया त्यांच्यासोबत शिरुरला गेली. मुलींना भेटली आणि अक्षरशः हादरु गेली. आठवी, नववीतल्या मुलींची लग्न झालेली. वीस, बावीस वर्षांच्या मुलींना तीन-चार मुलं. प्रकृतीची वाट लागलेली. प्रियासाठी हा मोठा धक्का होतात. तिचं लहानपण मुंबईत गेलं. लग्नानंतर ती साताऱ्यात आली. त्यामुहे हे जग तिला नवीन होतं. मुलींना या सगळ्यातून बाहेर काढायचं तर त्यांच्या व्यक्तिमत्वात बदल घडवणं गरजेचं होतं. त्यांना संघर्षासाठी तयार करायचं होतं आणि त्यासोबत कौशल्य uent girls विकासही साधायचा होता. प्रियाने हे आव्हान स्वीकारायचं ठरवलं. तिच्या पतीने याला पाठिंबा तर दिलाच शिवाय ते स्वतः ही तिच्यासोबत यायला तयार झाले. साताऱ्यात आर्थिक दृष्ट्या कमकुवत गटातल्या मुली प्रियाला भेटत. शिकायची इच्छा आहे. पण पैसे नाहीत. असं म्हणत. अशा वेळी अनेक मुलींना प्रियाने मोफत शिकवलं आहे. 'आयडीबाय' साठीही प्रशिक्षण दिलं आहे. सामाजिक जाणीव तिच्यात आहेच त्यामुळे एक वेगळे सामाजिक काम करण्याचा अनुभव घ्यायचा. अशी खूणगाठ बांधून सामान घेऊन प्रिया साताऱ्याहून शिरुरला पोहाचली. लेक लाडकी अभियाना' चं तिथं ऑफिस the aural Ceremony Thing Centre Dist-Beed