Jump to content

पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 स्वत: डॉ. राजश्री यांच्यासाठी मुलींना शिकवणं हा मोठा अनुभव होता. या साऱ्या मुली मायेच्या भुकेल्या होत्या. घरापासून प्रथमच दूर राहिलेल्या होत्या. त्यांना अनेकदा रागवावं लागायचं. पण रागावलं तरी ते आपल्या भल्याचं आहे याची त्यांना जाणीव होत त्यांचं सर्वार्थाने मोठे होत जाताना अनुभवणं हे आनंददायी होतं, असं राजश्री सांगतात.
 मुलींच्या सक्षमीकरणाचे असे प्रयोग सर्वदूर आणि अधिक व्यापक प्रमाणात व्हायला हवेत असं डॉ. राजश्री यांना वाटतं.