________________
-GCC *
मुलींना घडवताना... डॉ. राजश्री देशपांडे - ... ......सातारा जिल्ह्यातील सामाजिक कामांत नेहमीच पुढाकार असलेल्या डॉ. राजश्री देशपांडे यांच्यासाठी शिरुरमधील मुलींना आरोग्य सहायक म्हणून प्रशिक्षण देण्याचं वेगळं आव्हान होतं. पण इतर सहकारी आणि डॉक्टर मंडळी या सगळ्यांनी मिळून ते यशस्वीपणे पेललं –... ...... आरोग्य सहाय्यक होण्यासाठी म्हणून लेक लाडकी अभियानाने शिरुर तालुक्यातील मुलींसाठी प्रथमच प्रशिक्षण कार्यक्रम राबवायचं ठरवलं तेव्हा त्याआधी त्यांची एक पूर्वपरिक्षा घ्यायचं ठरलं. शिरुरमध्येच अभियानाच्या कार्यालयात ही परीक्षा झाली. अनेक मुलींना तेव्हा प्रश्नांचे अर्थही कळत नव्हते. अनेकींनी मराठीतून नीट उत्तरे लिहिता येत नव्हती. विज्ञानाचे पायाभूत ज्ञान तपासण्यासाठी घेतलेल्या त्या परिक्षेत एकूण प्रतिसाद यथातथातच होता. पण त्यातून मुलींची निवड करुन त्यांना साताऱ्यात प्रशिक्षणसाठी आणले गेले. शिवाजी विद्यापीठाच्या लोकविकास केंद्राने तयार केलेला अभ्यासक्रम या कोर्ससाठी शिकवायचं ठरलं. प्रत्यक्ष अभ्यासक्रम सुरु झाला तेव्हा मुलींनी जिद्दीने तो पूर्ण केला. आत्तापर्यंत ती बॅचेसने हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. पहिल्या बॅमचमध्ये २०, दुसऱ्या बॅचमध्ये १५ आणि सध्या १० मुली तिसऱ्या बॅचमध्ये शिक्षण घेत आहेत. या अभ्यासक्रमासाठी जी शिक्षकांची टिीम आहे. त्यात डॉ. राजश्री देशपांडे आहेत. त्या स्वत: मानसोपचारतज्ज्ञ आहेत. अन्य शिक्षक सहाकाऱ्यांमध्ये डॉ. स्मिता कासार आणि डॉ. अंजली मणेरीकर या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी दिलेलं सहाकर्य आणि प्रशिक्षण मुलींना उपयुक्त ठरतं. प्रा. संजीव बोंडे शरीरक्रिया शिकवतात. शिवाजी राऊत इंग्रजी घेतात. सामाजिक आरोग्य हा विषय स्वत: अॅड. वर्षा देशपांडे, तर डॉ. मेघा देशपांडे मेडिसीन हा विषय घेतात. हा पूर्ण एक वर्षाचा कोर्स आहे. वर्षभराने परीक्षा होते. शिवाजी