पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

GCCC * 2050 बालविवाह थांबवणे, मुली शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सक्षमपणे राहतील असे बघणे, कौशल्य आणि व्यवसाय प्रशिक्षणाच्या अपारंपारिक संधी उपलब्ध करणे आणि त्याद्वारे त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत करुन चुकीच्या गोष्टींना 'नाही' म्हणण्याचे त्यांच्यात धाडस निर्माण करणे अशा पध्दतीने प्रयत्न केला. तिला माणूस म्हणून जगताना किमान संधी आणि सुविधांचा लाभ मिळावा यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहिलो. हा सगळा प्रवास आणि झालेली प्रक्रिया आपणासमोर मांडला. शासन स्तरावर 'बेटी बचाव बेटी पढाव' अशी घोषणा देताना गेल्या पाच वर्षात देशपातळीवर काहीसे प्रयत्न केले असे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर आम्ही केलेला प्रयत्न पाहणे त्रयस्थपणे त्याचे मुल्यमापन होणे आणि या प्रक्रियेचा इतिहास लिहिला जाणे आवश्यक वाटले म्हणून संवेदनशील आणि वैचारिक स्पष्टता असणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पत्रकार म्हणून काम करत असलेल्या प्रगती बाणखेले यांना आम्ही विनंती केली की, शिरुरला येऊन आमच्या प्रवासातील सर्व सहप्रवाश्यांशी बोलून या सर्व प्रक्रियेचा लेखाजोखा मांडावा. __ आज बीड जिल्ह्यातील मुलींची संख्या वाढती आहे आणि सातत्याने वाढताना दिसत आहे. तसेच, भविष्यकाळात बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील बालविवाह, बालिकांचे मृत्यू, बालिकांवरील अत्याचार, अन्याय कौटुंबिक हिंसा थांबावी, शिक्षणाच्या दर्जेदार संधी या सर्व लेकींना मिळाव्यात यासाठी लेक लाडकी अभियान प्रयत्नशील राहणार आहे. मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होणारे कामगार मोठ्या प्रमाणात बालकामगारांसाठी आणि कापूस वेचण्यासाठी मुलींचा वापर आणि शिक्षणाच्या सर्व स्तरावर ती पूर्णपणे दुर्लक्षित राहिली आहे असे लक्षात आले. त्याचबरोबर लहान मुलींनी आई होण्याच्या बाबतीत सुध्दा अग्रेसर असणारा हा जिल्हा खूप मोठ्या प्रमाणावर मुलींची पळवापळवी करणे, अत्याचार या सर्वांमध्ये हा जिल्हा आघाडीवर असल्याचे जाणवत होते. याच जिल्ह्यातील एक छोटा तालुका शिरुर कासार आम्ही निवडला आणि एक प्रक्रिया करण्याचे ठरवले, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने खास करुन तालुका आरोग्य अधिकारी आणि त्यांच्या आशाताईंनी या सर्व प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग द्यायाचे कबूल केले आणि म्हणूनच दोन-अडीच वर्षे सातत्याने बालविवाह थांबविणे, मुलींना व्यवसाय प्रशिक्षण देणे आणि चुकीच्या गोष्टींना 'नाही' म्हणण्याची ताकद निर्माण करेण असा आगळावेगळा प्रयत्न आम्ही मुलींसोबत केला. तो सगळा अतिशय रोमांचकारी असा अनुभव जगासमोर मांडला. तो मांडत असताना या सर्व

29