________________
Ge*
- -
मनोगत - गेल्या तीस वर्षापासून महिला, दलित अल्पसंख्यांक यांच्याबाबत होणारे डीस्क्रिमिनेशन म्हणजेच त्यांना दिल्या जाणाऱ्या दुजाभावाच्या वागणुकी विरुध्द आणि त्यामुळे होणाऱ्या अत्याचाराविरुध्द आम्ही सातत्याने भूमिका घेतली. १९७५ ते १९८५ ही दहा वर्षे जगभरामध्ये महिला दशक म्हणून साजरी केली गेली. यादरम्याने महिलांविषयक अनेक प्रश्न आणि मुद्दे राजकीय विचार मंचावर चर्चेला आले. आम्ही आता महाराष्ट्रात तसेच देशपातळीवरील मुलींच्या कमी होणाऱ्या संख्येबाबत काम करणारी 'डेकॉय ऑपरेशन' करणारी एकमेव संस्था म्हणून ओळखले जातो. ___ गेल्या तीस वर्षात ही ओळख निर्माण करताना या प्रवासात अनेक महत्त्वपूर्ण टप्पे आले. जन्माला येण्याच्या आधीपासून ते मृत्यूपर्यंत म्हणजेच जीवनभर मिळणाऱ्या दुजाभावाच्या वागणुकी विरुध्द आणि हिंसे विरुध्द संस्थेचा ठराव पारित करुन आम्ही काम करण्याचा निर्णय घेतला. एरवी तक्रारदार महिला आल्यास तिच्या मदतीसाठी आम्ही आंदोलन तसेच न्यायालयीन लढाईचा निर्णय करतो. परंतु आईच्या गर्भामध्ये असताना जिचा केवळ मुलगी आहे, म्हणून जन्माचा हक्क नाकारला जातो आणि त्यामुळे देशात सहा लाख मुली दरवर्षी गायब केल्या जातात. अतिशय प्रभावी कायदा असूनही त्याची अंमलबजावणी वीस वर्ष होऊ शकली नाही. आम्ही निर्णय करुन जाणीवपूर्वक जवळजवळ पन्नास डेकॉय ऑपरेशन्स करुन गर्भलिंग निदान करताना डॉक्टर्सना रंगेहात पकडले आणि लेक लाडकी अभियान म्हणून देशपातळीवर दखल घेण्या एवढे काम उभे केले. एवढेच पुरेसे नव्हते, मुलींनी जन्माला येणे महत्त्वाचे आहेच आणि त्याबरोबरच दुजा भावाने मिळणाऱ्या वागणुकीला विरोध करणारी एक पिढी घडवणे गरजेचे वाटले; म्हणून इंग्रजीमध्ये म्हटल्याप्रमाणे 'कॅच देम यंग' म्हणजेच तरुण माणसेच बदल घडवतील, त्या बदलासाठी त्यांना सक्षम बनवा हीच भूमिका घेऊन आम्ही बीड जिल्ह्यामध्ये शिरुर कासार तालुक्यात दोन वर्षात ५३ ग्रामपंचायती, ९६ वाड्या-वस्त्यांवर, १८० गटांमधून, २५८२ मुलींसोबत समतेच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली.
29