पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विषयांवर घरात, बाहेर, शाळेत कुठेच मोकळेपणाने बोलले जात नसल्याने मुलींच्या मनात अनेक शंका, होत्या. प्रश्न होते. या प्रशिक्षणामुळे अनेक दिवस कोंडून ठेवलेल्या प्रश्नांना वाट मिळाली. मुली बोलत्या झाल्या. त्यानी मनातल्या अगदी छोट्या छोट्या शंकांचे निरसन करुन घेतले. अशी माहिती त्यांना आजवर कुणी दिलीच नव्हती. त्यामुळे मासिक पाळी, मातृत्व याबद्दल त्यांच्या मनात उगाचच असणारे अपराधीपण दूर झाले. मुलींना आत्मविश्वास आला. या प्रशिक्षणाचा आणखी एक फायदा म्हणजेच मुली बाहेरही बोलू लागल्या. प्रश्न विचारण्यातला संकोच दूर झाला. दुसऱ्या टप्प्यात तालुक्यातल्या महिलांनाही सहभागी करुन घेण्यात आलं. तो अनुभवही वेगळाच होता. ओळख स्वत:ची, दारुबंदी, मुलगा-मुलगी एकसमान, बालविवाहबंदी असे अनेक विषय प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुली आणि महिलांपर्यंत पोहोचवायचे होते. त्यातून स्वतः ही नकळत सक्षम झाल्याचं शोभा सांगतात.<br.  महिला ग्रामसभा हा प्रकार या भागात फक्त कागदावरच असायचा. अभियानाच्या माध्यमातून प्रथमच तालुकाभर महिलांच्या सभा झाल्या जवळपास १००% उपस्थिती असलेल्या या सभामधून महिलांना आपल्या कायदेशीर हक्कांची जाणीव झाली. मनात आणले तर महिलांचे मत गावच नव्हे तर देशही बदलू शकते. हा विश्वास त्यांना मिळाला. आजवर गावातल्या महिला बाहेर पडून जाहीरपणे आपले प्रश्न मांडत आहेत. असे कधीही झालं नव्हतं. ते प्रथमच तालुक्यात घडलं. त्याही पुऐ पाऊल टाकत तालुक्यात घरावर आणि सातबाऱ्यावर पती-पत्नीचे दोघांचे नाव असावे. या संकल्पनेतून घर दोघांचे आणि लक्ष्मीमुक्ती अशा दोन योजनांबद्दल चर्चा केली. या सगळ्याचा परिणाम म्हणून पुरुषांच्या विचारांतही बदल झाला. मुलींचं लहानपणी लग्न न करता त्यांना शिकवायला हवं, हे त्यांना पटू लागलं. अनेक ठिकाणी मुलींच्या शाळा त्यांच्या गावांपासून दूर होत्या, वाहनाची सोय नव्हती. काही ठिकाणी अभिमान्या प्रयत्नातून एसटी बस सुरु झाल्या तर काही ठिकाणी देणगीदारांच्या मदतीतून मुलींना सायकली मिळाल्या. आता शिक्षणाचे महत्त्व मुलींनाच नव्हे तर पूर्ण कुटुंबाला समजले आहे. त्यांना बालविवाहात न अडकवता शिक्षण देऊन सक्षम करण्यसाठी पालक स्वत:च आग्रही आहेत, याचं सारं श्रेय शोभा अभियानाला देतात.' अभियानाने मला सगळ्यात मोठी गोष्टी दिली. ती म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वात झालेला बदल' असं शोभा अभिमानाने सांगतात. घर आणि नोकरी यापलीकडे कधी विचार न केलेल्या शोभा या अभिमानाच्या निमित्ताने तालुकाभर हिंडल्या. मुली,