Jump to content

पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-GCCC * सक्षमीकरणाची वाट शोभा वाघुलकर - ... ....... आरोग्य विभागात काम करताना त्यांना किशोरी आणि महिलांच्या आरोग्यासाठी वेगळं काम करण्याची संधी लेक लाडकी अभियानाच्या कामातून मिळाली मुली आणि महिलांना आरोग्य प्रश्नाबाबत प्रशिक्षणाच्या माध्यमातून सजग करताना त्यांना स्वत:बद्दलही आत्मविश्वास मिळाला. - ... ......शोभा आरोग्य सेविका आहेत. आरोग्य केंद्रात एएनएम म्हणून काम करत होत्या. शिरुर तालुका आरोग्य केंद्रामध्ये त्या बदलून आल्या तेव्हा त्यांच्याकडे तालुका नर्सिंग ऑफिसर या पदाचा कार्यभार सोपवण्यात आला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश तांदळे 'लेक लाडकी अभियाना'चे अनेक वर्ष मार्गदर्शक आहेत. महिला आणि मुलींच्या सक्षमीकरण कार्यक्रमात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो तर अभियानाशी संबंधित असलेल्या ढाकणे सिस्टर शोभा यांची मैत्रीण. या दोघांमुळे लेक लाडकी अभियानाने तालुक्यात जेव्हा काम सुरु केले तेव्हा या कामात आपला सहभाग असला पाहिजे. हे त्यांना प्रकर्षान वाटलं. या कामासाठी रोजच्या कामामधून थोडा वेळ काढावा लागणार होता. पण यासाठी त्यांची तयारी होती. मोहिमेची सुरवात झाली शिरुरमध्ये झालेल्या एका प्राथमिक शिबिरातून त्यात सगळ्यांच्या ओळखी झाल्या. तालुक्यात नक्की काय स्वरुपाचे काम राबवायचे आहे. याबबात कल्पना आली. त्यानंतर पुढचे प्रशिक्षण साताऱ्यात झाले. किशोरवीयन मुलींसाठी काम करायचे होते. त्यांच्या गटांचे प्रशिक्षण घ्यायाचे होते. या वयोगटातील मुलींच्या आरोग्यविषयी मुलींना बोलते करुन त्यांचे प्रश्न सोडवायचे होते. शोभा खरे तर आरोग्य विभागात काम करणाऱ्या पण तरीही हे प्रशिक्षण त्यांना अनेक नव्या गोष्टी शिकण्यसाठी उपयोगी पडलं. विशेषत: किशोरवयीन मुलींच्या मानसिकतेबद्दल अधिक स्पष्टता आली. ___ त्यांनी या किशोरवयीन मुलींचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले तेव्हा या मुलींकडून मिळालेला प्रतिसाद अत्यंत अनपेक्षित होता. मासिक पाळी, जनन आरोग्य या