Jump to content

पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




सांगतात.
 गेल्या दोन वर्षात शिरुरमधल्या मुलींच्या बदलत्या आयुष्याची नीता साक्षीदार आहे. आधी घरात, शाळेत मुलींना कुठेही कोणत्याही गोष्टीसाठी पाठिंबा मिहत नसे. त्यांच्या इच्छा, अशा आकांशा याबद्दल कुणाला फारसं देणंघेणं नसायचं. पण मुली अभियानाशी जोडल्या गेल्यानंतर त्या मोकळेपणाने व्यक्त होऊ लागल्या. स्वत:विषयी बोलू लागल्या, स्वत:बद्दल ठरवू लागल्या. स्वत:वर झालेल्या अन्यायाबद्दल आवाज उठवू लागल्या. आता त्या एकमेकींना मदत करतात, एकमेकांसाठी उभ्या राहतात. याही पलीकडे जाऊन 'लेक लाडकी अभियान' आपल्यामागे उभे आहे. याचा विश्वास मुलींना वाटतो. हा बदल बघणं आणि या बदलाच्या प्रक्रियेचा एक भाग होणं हे नीताला खूप समाधान देणारं वाटत. गेल्या दोन वर्षांत अनेक कार्यक्रम झाले. किशोरी मेळावा झाला. जनसुनावनी झाली. मुली तिथं बोलल्या. त्यांच्या अडचणी त्यांनी अधिकारी आणि इतर वरिष्ठांसमोर मांडल्या. मुलींना अभियानातर्फे शाळेत जाण्यासाठी सायकली दिल्या गेल्या. त्यांची शाळेची वाट सोपी झाली. या अभियानाचा भाग होताना नीताचं आयुष्यही बदललं. आत्मविश्वास आला. आधी एक गृहिणी आणि अंगणवाडी मदतनीस एवढंच विश्व असणाऱ्या नीताचं क्षितिज विस्तारलं. वयात येणाऱ्या मुलींच्या शरीरातले बदल त्यांना शास्त्रीय पध्दतीने सांगताना आपल्याला नीतासह इतर कार्यकर्त्यांचे फोन नंबर मुलींकडे आहेत. कुणाचा बालविवाह होता आहे असे वाटले, कुणाला आणखी काही समस्या असतील तर मुली विश्वासाने फोन करतात. काही निनावी फोनही येतात. त्यांना योग्य मदत मिळेल असं पाहिलं जाते. अभियानाने तालुक्यातल्या लोकांचे विचार बदलले. असे नीताला वाटते. नीता शिरुरमध्ये २०१५ पासून अंगणवाडी चालवते. तिची अंगणवाडी असलेला परिसर झोपडपट्टीचा. शिरूरमध्ये एकूण सात अंगणवाड्या त्यात ही सगळ्यात गरीब वस्तीतली. अंगणवाडीसाठी नीताला एक पडकी खोली मिळाली होती. त्या कोपऱ्यावर वस्तीतले लोक लघुशंका करायचे. खिडकी उघडकी की भपकारा यायचा. दरवाजा तुटका होता. त्यातून फिरस्ते कुत्रे, डुकरं आत यायची.त्यांनी रात्री घाण करुन ठेवलेली असायची. पाण्याची काही सोय नव्हती. अशा वातावरणात मुलांना पोष आहार द्यावा लागायचा. नीताला याचा भयंकर त्रास व्हायचा, अपराधी वाटायचं पण पर्याय नव्हता. लेक लाडकी अभियानाशी संपर्क आल्यावर तिने एकदा वर्षा देशपांडे यांना तिची अंगणवाडी नेऊन दाखवली. त्या तिथं उभ्याही राहू शकल्या नाहीत इतकी घाण होती. दरम्यानच्या काळात पंचायत समितीने