पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-GCCC *

बदलाची साक्षीदार नीता ढाकणे - ... ...... अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करणारी नीता लेक लाडकी ___ अभियानाच्या माध्यमातून शिरुर तालुक्यातील किशोरींच्या सक्षमीकरणाच्या कामात सहभागी झाली. मुलींच आयुष्य बदलत गेल आणि त्यासोबत नीताचंही. -... ...... नीत राहते शिरुरमध्ये. तिचं शिक्षण एमए बीएड. २०१३ मध्ये तिचं लग्न झालं आणि २०१४ मध्ये ती एका मुलीची आई झाली. २०१६ पर्यंत घर, संसार, मुलगी याच विश्वात ती रमली होती. दरम्यानच्या काळात एका अंगणवाडीत मदतनीस म्हणून तिनं काम सुरु केलं होतं. २०१६ मध्ये ती लेक लाडकी अभियानाच्या संपर्कात आली. शिरुरमध्ये एक मोठा किशोरी मेळावा झाला. तालुक्यातल्या मुली त्यानंतर अभियानाशी जोडल्या गेल्या. आशाताईंचा या कामात खूप मोठा सहभाग होता. त्यामुळे त्यांचं प्रशिक्षण, किशोरींचे गट, त्यांचे प्रशिक्षण अशा कामांमध्ये नीताचा सहभाग होता. ___ अभियानाचे कार्यक्रम मुलींपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम म्हणून काम करताना येणारे अनुभव वेगळे होते. त्यात एक स्थानिक म्हणून येणाऱ्या जबाबदाऱ्या वेगळ्या होत्या. बालविवाहांच्या प्रश्न प्राधान्याने हाती घेतला होता. पण त्यावेळी वयात आलेल्या मुलींचे ऊसतोडीला जाताना काय करायचं ? त्यांच्या सुरक्षेची हमी कोण देणार ? अशा प्रश्नांची समाधान करणारी उत्तरं पालकांना द्यायची होती. वेगवेगळ्या कोर्सेसमधून आणि प्रशिक्षणामधून ते शक्य झालं.मुलींना शिकवणं कसं महत्त्वाचं आहे. याची जाणीव पालकांना करुन देता आली. हे सारं करताना मुलींना आपलेपणा वाटावा म्हणून कन्यादिनाचा कार्यक्रम झाला. मुलींना भरपूर धमाल केली. गाणी म्हटली, मेंदी काढली, हव्या त्या छान छान बांगड्या घातल्या ! मुलींना 'अभियान आणि अभियानाचे कार्यकर्ते' म्हणजे विश्वासाचं दुसरं कुटुंब वाटू लागलं. नीताशी आता या मुली मैत्रिणीच्या नात्याने बोलतात, तिला अडचणी SC.

29