पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-GCC *

किशोरींची मैत्रीण मुक्ता गिते - ... ...... गावातली एक आशा सेविका गावातल्या किशोरींना एकत्र करताना गाव बदलण्यासाठी सज्ज झाली. गावातल्या महिलांना सोबत घेऊन 'लेक लाडकी अभियाना'च्या भक्कम पाठिंब्यावर तिने हे करुन दाखवलं शिरुर तालुक्यात राहनही मुक्ता गिते बालविवाहाच्या शिकार झाल्या नाहीत. याचं कारण त्यांची वहिनी. भाऊ आणि वहिनी सुशिक्षित. वहिनीने भावाकडे आग्रहच धरला की काहीही झाले तरी मुक्ताचे लग्न १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लावायचे नाही. त्यामुळे बारावीची परीक्षा दिल्यावर त्यांचे लग्न झाले. भाऊ आणि वहिनीमुळे घरातही प्रगतीशील विचार कायमच असाचे. लिंबा हे त्यांचे माहेर आणि सासरही. त्यामुळे हा पाठिंबा कायमच राहिला. दहा वर्षापूर्वी त्यांना गावतल्या सिस्टरने जेव्हा सांगितले की अशा वर्कर म्हणून काम करण्याची संधी आहे. तेव्हा चालून आलेली ही संधी त्यांनी सोडली नाही. गाव छोटे बाराशे लोकवस्तीचे, त्यात दुर्गम. त्यामुळे गावाची आशा वर्करवर मोठी भिस्त. स्वत:चेच गाव असल्यामुळे लोकांना नाही म्हणणजे जमायचे नाही आणि मुक्ताताईंच्या ते स्वभावासाठी नव्हते. आशा वर्कर म्हणून काम सुरु होते. वेगवेगळी सर्वेक्षणं, रुग्णसंख्या, लसीकरण, गर्भवतींच्या नोंदी अशी सगळी कामे करुन हाताशी पैसा फार लागत नव्हता. पण जे काम करायचे ते मनापासून असा शिरस्ता असल्याने समाधान होतं. कामाची पाच पुरुस्कारांच्या रुपाने मिळाली. त्यांना तालुका स्तरावर दोन आणि जिल्हा स्तरावर दोन पुरस्कार मिळाले. कामाचा हुरुप वाढला. त्याचवेळी — लेक लाडकी अभियाना'चे काम शिरूरमध्ये सुरु झाले होते. मुक्ताताई एक दोन बैठकांना उपस्थित राहिल्या. त्यांचं काम चांगलं होतंच. शिवाय किशोरवयीन मुलींसोबत काम करण्याची तयारीही होती. वेगवेगळ्या गावांतील अशा सेविका हा या प्रकल्पाचा कणा होता. या आशांशी संपर्क ठेवायचं काम मुक्ताताईंकडे सोपवण्यात आलं. त्या आनंदाने तयार झाल्या.

29 -१९