मैत्रिणी योगितासोबत आल्या. मुलींनी सकाळी प्रभातफेरी सुरु केली. घरासमोर जाऊन मुली घोषणा देत. त्या आल्या की बायका घरात जाऊन दार बंद करुन घ्यायच्या. मग मुलींनी वेगळी कल्पना लढवली दुसऱ्या दिवशी त्या हलगी घेऊन गेल्या. लोकांच्या दारात जाऊन जोरजोरात हलगी वाजवणं सुरु केलं. या आवाजाने बुजून दारात बंधलेली जनावरं गळ्यातलं दावं तोडून पळायची. अखेर याला कंटाळून लोकांनी शौचालयं बांधायची तयारी दाखवायला सुरुवात केली. एकापाठोपाठ एक शौचालय पूण होऊ लागलं. बायका आता स्वतः हून पेढं येऊ लागल्या. आता गोमळवाडा गावात ९९% घरात शौचालये आहेत. योगिताच्या या कामाची दखल घेऊन तिला बीड जिल्ह्याची स्वच्छतादूत म्हणून नेमलं गेलं. त्यानंतर जिल्हा राज्य पातळीवर अनेक पुरस्कार तिला मिळाले. ठिकठिकाणी सत्कार झाले. तिची भाषणं झाली. गावात १० ते १५ कुटूंबामध्ये अद्यापही शौचालय नाही, कारण काही लोकांच्या नव्या घराचे काम सुरु आहे. काही जण मळ्यातून गावात तर काही गावातून मळ्यात राहायला जाणार आहेत. येत्या काही महिन्यांत हे झाले की पूर्ण गावात १०० टक्के शौचालये होती. गावात शौचालये झाली तरी त्यांचा वापर करण्याची मानसिकता मात्र नव्हती त्यामुळे योगिता आणि मैत्रिणींनी नवे काम सुरु केले. सकाळी साडेचारला त्या उठायच्या आणि ज्या बाजूला लोक शौचाला जातात. तिकडे मॉर्निंग वॉकला जायच्या. शौचाला डबे घेऊन बाहेर पडलेले लोक मुलींना बघून पुन्हा माघारी जायचे. महिनाभर हा प्रयोग केल्यावर लोक शौचालयांचा वापर करुन लागले ! मुलींनी गावातल्या शौचालयांसोबत शाळेचे शौचालयही नव्याने बांधण्याचा आग्रह मुख्याध्यापकांकडे धरला. त्यांना तो मान्यही झाला आणि शाळेलाही नवे स्वच्छतागृह मिळाले. दरम्यानच्या काळात योगिता 'लेक लाडकी अभियाना'च्या कामाशी जोडली गेली. तिच्या गावात किशोरींचा सावित्रीबाई फुले गट तयार णाला. शिबिरे, कार्यक्रम या निमित्ताने तालुक्यातील इतर गावातील महिला आणि मुलींशी संवाद होऊ लागला. त्यांच्याशी शौचालये आणि त्यांचे महत्त्व यावर चर्चा झाल्या. सरकारी कार्यालयांत महिलंसाठी शौचालये नाहीत, या मुद्द्यावर गटाच्या मुलींनी महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली. त्यांनी ही स्थिती मान्य करुन बदलाचे आवश्वासन दिले. योगिताच्या गटाने आता खालापूरी गावात काम सुरु केले आहे. तेही लवकरच हागणदारीमुक्त होईल अशी तिची खात्री आहे. पूर्ण तालुकाभर पथनाट्ये, लघुपट या माध्यमातून स्वच्छता अभियान लोकांपयर्यंत पोहोचवणं आणि अधिकाधिक महिला आणि मुलींना त्यात सहभागी करुन घेण्याचा योगिताचा प्रयत्न आहे !
पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/26
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे