पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-GCCC

स्वच्छतेची दूत योगिता गवळी - ... ......तिने शाळकरी मुलींना एकत्र करुन गावात पालकांच्या विरोधात मोर्चा काढला. मुलींची मागणी होती घरांत शौचालय बांधण्याची, मुलींनी पालकांनाच नव्हे तर सरकारी यंत्रणेलाही कामाला लावलं आणि प्रत्येक घरात शौचालय उभं राहिलं. आता 'लेक लाडकी अभियाना'च्या मदतीनं मुली शेजारच्या गावांतही हा स्वच्छतेचा प्रयोग राबवत आहेत. –... ......गोमळवाडा हे शिरुरमधलं छोटंसं गाव. न्यू इंग्लिश स्कूल ही तिथली शाळा गावाच्या अगदी सुरुवातीलाच लागते. योगिता गवळी या शाळेत दहावीपर्यंत शिकली. आता ती बारावीत आहे. योगिता दहावीला होती तेव्हाची गोष्ट, देशात सगळीकडे स्वच्छतेचे वारे वाहू लागले होते पण गोमळवाडा गावाला त्याच्याशी काहीच घेणे देणे नव्हते. गावात एकही शौचालय नव्हते. लोक उघड्यावर शौचाला जायचे. तेही शाळेच्या बाहेर ! सगळा परिसर गलिच्छ झालेला असायचा. दिवसभर वर्गात इतकी दुर्गंधी की मुले डबा खाऊ शकत नसत. शाळेच्या मैदानावरही घाण केलेली असायची त्यामुळे खेळताही यायचं नाही. गावतले सगळेच मोई लोक यात सामील होते. त्यामुळे कुणी कुणाला बोलयाचा प्रश्नच नव्हता. योगिता आणि तिच्या मैत्रिणींचा हे बघून रोज संताप व्हायचा. हे लोक असे का वागतात, म्हणून हात पाय आपटायच्या. पण यासाठी काय करायंच, हे मात्र कळत नव्हतं. त्याच काळात राज्यात वेगवेगळ्या समाजाचे मोर्चे निघत होते. त्यांचे मोठमोठाले फोटो वर्तमानपत्रात दिसत. टिव्हीवर दाखवले जात. त्यातून योगिताला एक कल्पना सुचली. आपणही एक मोर्चा काढायचा. मात्र तो शासनाच्या विरोधात नाही तर पालकांच्या विरोधात. घरात महागडे फोन, टिव्ही, गाड्या घेण्यासाठी पालक पैसे खर्च करतात. पण कुटुंबासाठी शौचालय बांधायची मात्र तयारी नसते. त्यामुळे पालकांना जागं करायचं आणि त्यातून शाळेचा परिसरही स्वच्छ होईल. अशी योगिताची कल्पना होती. योगिताने वडिलांना शौचालय बांधायची गळ घातली. त्यांनीही तयारी दाखवली आणि काम सुरु झालं. एकदा स्वत:च्या एमालाला चालनम

29 -१६