पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

GCC * -SG गावातल्या महिलांनी ठरवलं तर दारुची दुकानं बंद होऊ शकतात. ही एवढीशी शाळकरी मुलगी पण मोठी जिद्दी. महिलांच्या ग्रामसभेत हा विषय काढायाचा असं तिनं ठरवलं. ग्रामसभा ठरली होती सकाळच्या वेळात पण शेतात कामावर जाणाऱ्या सगळ्यांना सोयीचं व्हावं म्हणून तिनं ही सभा संध्याकाळी घ्यायचं ठरवलं. तसा गावात प्रचारही केला. परस्पर वेळ बदलल्यामुळे ग्रामसेवकासह सगळेच तिच्यावर चिडले. पण तिला उपस्थितीची खात्री होती. साडेतीनशे लोक बसू शकतील एवढं सभागृह खचाखच भरलं होतं. किर्तनाशिवाय पहिल्यांदाच एखाद्या वेगळ्या कार्यक्रमाला महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. ऋतुजाने दारुचा मुद्दा काढला तेव्हा तिच्यावर सगळेच संतापले. 'तू धड १६ वर्षांचीही नाहीस. इतर गोष्टींकडे लक्ष द्या. अंगणवाडीत मुलांना पोषण आहार मिळतो का बघा, गावातले शिक्षणाचे काही प्रश्न असतील तर तिकडे लक्ष द्या. सुरुवातीला इतक्या मोठ्या विषयाला कशाला हात घालता ? एकदम सगळेच अंगावर आले. ऋतुजासह सगळ्या बायका गप्प बसल्या, पण तेवढ्यापुरत्या. नंतर त्यांनी ऋतुजाच्या घरी तिचे वडील नसताना मीटिंग घेतली. गावातले दोन तरुण त्यांना मदत करायला तयार झाले. त्यांनी या बायकांना दारुबंदीचा अर्ज लिहायला मदत केली. मीटिंगला हजर असलेल्या बायकांची संख्या होती १५. घरातले काय म्हणतील, नवरा मारझोड करेल अशा काळजीमधून प्रत्यक्षात पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात पोहोचल्या फक्त सहाजणी. हेही कमी नव्हतं. अधीक्षकांनी पोलीस ठाण्यात फोन केले. या बायका गावात पोहोचण्यापूर्वीच दारुचे दुकान बंद झाले होते. पण हे फार दिवस टिकले नाही. काही दिवसांत ते पुन्हा सुरु झाले. बायकांनी अधिक्षकांना पुन्हा फोन केले. पुन्हा दुकान बंद झाले. एकदा तर त्या दुकानावर पोलिसांनी छापाही टाकला. पण त्याआधीच दुकानातील दारु दुसरीकडे लपवली गेली होती. पकडून नेलेले लोकही सुटले. यानंतर ऋतुजाला घरातल्या लोकांनी तर सुनावलेच पण आजूबाजूचे लोकही बालू लागले. नसते उद्योग बंद कर, म्हणू लागले. त्यात गावातली दारु बंद करायला निघालेल्या महिलांना सहकार्य करणाऱ्या पोलिस अधीक्षकांची बदली झाली. आता नवे अधिकारी रुळायचे आहेत. दरम्यानच्या काळात गावातले दुकान पुन्हा सुरु झाले आहे. ऋतुजा पुन्हा एकदा दोन हात करायच्या तयारीत आहे. या सगळ्यांत आनंदाची गोष्ट म्हणजे तिच्या वडिलांची दारु सुटली. एकेकाळी फक्त ५५ किलो असलेले त्यांचे वजन आता व्यसन सुटल्यावर ७० किलोपर्यंत गेले आहे ! ऋतुजा सभाधीट आहे. ती पाचवीपासून वक्तृत्व स्पर्धेत भाग घेते. एकदा तर तिच्या भाषणाला दोन हजार

529 -१४