________________
-Grc लढवय्यी
- -00
ऋतुजा जगदाळे ..... .. .... मुळातच लढाऊ बाण्याच्या ऋतुजाला नेतृत्वाची संधी मिळाली आणि 'लेक लाडकी अभियाना' च्या माध्यमातून तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या गावातील महिलांना तिने लढायला शिकवलं. - ... ...... ऋतुजा सतत बोलत राहते. तिला नेहमी काही तरी सांगायचं असतं. आपलं म्हणणं खुलवून सांगण्याची, घटनेतले बारकावे टिपण्याची विलक्षण हातोटी तिच्याकडे आहे. ती शिरुरच्या कालिकादेवी महाविद्यालयात बारावीत शिकते. तिचं गाव कोळवाडी, शिरुरपासून काही अंतरावरच आहे. ती नववीत असताना 'लेक लाडकी अभियाना'च्या प्रकल्पामधून किशोरी गटात आली. दहावीची परीक्षा संपली आणि तिला इतर मुलींसोबत साताऱ्यात किशोरींच्या शिबिरासाठी जाता आलं. पहिल्यांदात ऋतुजा एका छान मुक्त वातावरणात आली होती. या शिबिरात मुलींना त्यांच्या हक्कांविषयी प्रथमच कळालं. मुली न्यायालयात गेल्या, बँकेचं काम पाहायला गेल्या, बचत गट फेडरेशनचं काम कसं चालतं हे त्यांनी पाहिलं. सहलीला गेल्या. भरपूर धमाल केली. ऋतुजा तिथून परत आली ती एक नवी ऊर्जा घेऊन. गावातल्या किशोरींनी एकत्र येऊन केलेला गट होताच. अनेक वाईट प्रथांच्या विरोधात त्यांना लढायचं होतं. म्हणून गटला नावं दिलं राणी लक्ष्मीबाई गट. दरम्यान, गटाची प्रमुख असलेली मुलगी गाव सोडून पुढच्या शिक्षणासाठी परगावी गेली आणि ऋतुजा गटाची प्रमुख झाली. ऋतुजाचे वडील दारु प्यायचे. वाढत्या वयातल्या ऋतुजाला हे अजिबात आवडायचं नाही. गावात तिच्या वडिलांसारखे आणखीही दारु पिणारे लोक होते. दारु पिऊन घरात बायकांना, मुलांना होणारी मारहाण रोजचीच होती. गावातल्या दारुच्या दुकानातून त्यांची ही गरज भागवली जायची. याविरोधात ऋतुजा घरात, बाहेर बोलू लागली. पण काही उपयोग होत नव्हता. कुणी तरी सांगितलं की
29