पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

GCC *

  • 900

घरात हवं ते करण्याचं स्वातंत्र्य आहे, त्यामुळे ती दोनेक वर्षात याबद्दल विचार करेल. त्याआधी या क्षेत्रातील आणखी प्रशिक्षण घेण्याची तिची इच्छा आहे. माधुरीच्या बॅचमधल्या आणि आधीच्या बॅचमधल्या अनेक मुली घरातच छोटे पार्लर चालवतात किंवा काहीजणी मागणीनुसार सेवा देतात. दुसरीकडे शिकवतातही. कॉलेजच्या फीपुरते पैसे त्यातून सहज मिळतात. या भागात अनेक कुटुंबात अजुनही मुलींना लग्नानंतर नोकरी करु दिली जात नाही. पार्लरसारख्या व्यवसायातून घरबसल्या चांगले पैसे मिळतात, हे मुलींनी अनुभवलं आहे, त्यामुळे हा कोर्स चांगलाच लोकप्रिय झाला. अभियानामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास आला, असं माधुरी सांगते. त्यापूर्वी तालुक्यातील परिस्थिती भयंकर होती. बालविवाहांविरोधात पुढे येऊन बोलण्याचे धाडस मुलींमध्ये आलं. माधुरीच्या आईचा बालविवाह होता. त्याची अनेक पातळ्यांवर किंमत मोजावी लागते हे त्यांनी अनुभवले आहे. त्यामुळे मुलींची लग्न १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय करायची नाहीत, हे त्यांनी ठरवून टाकलंय. माधुरीच्या मोठ्या बहिणींची लग्नंही त्या सज्ञान झाल्यावरच झाली. पदवीधर झाल्यावर स्वत:चा व्यवसाय सुरु करावा किंवा याच क्षेत्रात अधिक प्रशिक्षण घेऊन मनोरंजन क्षेत्रात जावे, असा विचार ती करते. मात्र, मुलींच्या बाह्य सौंदर्यापेक्षा आत्मविश्वास आणि स्वावलंबन यांतून येणारं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. असं सांगायला माधुरी विसरत नाही.

  • -500

2