पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-GC *

  • -

स्वावलंबनातलं सौंदर्य माधुरी चिपाड - ... . ... तिने ब्युटी पार्लरच्या कोर्ससोबत व्यक्तिमत्व घडेहि गिरवले. तिचं पदवीपर्यंतचं शिक्षण अद्याप पूर्ण व्हायचं आहे. पण त्याआधीच तिनं स्वत:च्या पायावर उभी राहण्याची क्षमता आणि त्याहून मोठा आत्मविश्वास कमावला आहे. ... ..... Inaugural Caen Vocational Train माधुरीच्या आई जयश्री चिपाडे बचत गटांचे काम करतात. कालांतराने त्या लेक लाडकी अभियानाशी जोडल्या गेल्या. आईचं काम बघून हिवरशिंगा गावात माधुरीनेही सावित्रीबाई फुले गटाच्या माध्यमातून काम सुरु केलं. तेव्हा ती दहावीत होती. दहावीच्या सुट्टीच्या काळात हाताशी भरपूर वेळ होता आणि लेक लाडकी अभियानाने शिरुरमध्ये काही कोर्सेस सुरु केले होते. त्यात ब्युटी पार्लरचा कोर्स होता. गावात मुलींनी काही व्यवसाय सुरु केला तर त्या सर्वांचा प्रतिसाद मिळेल असा हा व्यवसाय होता आणि माधुरीलाही त्याची आवड होती. रोज हिवरशिंगा इथून निघून १० वाचता शिरुरला पोहोचायचं. वेगवेगळ्या गावातून ३५ मुली या कोर्ससाठी यायच्या. प्रिया चव्हाण या साताऱ्याहून आलेल्या ब्युटीशियन हा कोर्स घ्यायच्या. मुलींनी पार्लर फक्त पाहिलं होतं. कुणी अधूनमधून गेलंही होतं. पण प्रत्यक्ष त्या गोष्टी करुन कधीच पाहिल्या नव्हत्या. पण सगळ्यांनाच त्याची प्रचंड आवड होती. त्यामुळे मुली मनापासून शिकल्या. थ्रेडिंग, वॅक्सिंग, फेशिअल, हेअर कट, मॅनिक्युअर, पेडिक्युअर अशा गोष्टी मुली सहज करु लागल्या. तीन महिन्यांच्या कोर्समध्ये अगदी तरबेज झाल्या माधुरी तर आता स्वतंत्रपणे लग्नाचे मेकअप करते. या कोर्स मध्ये केवळ बाह्य सौंदर्यच नव्हे तर आहार, पोषण याबद्दलही मुलींना शिकवलं गेलं. या शिवाय बाहेर बोलावे, वागावे कसे, संवाद कसा साधावा अशा व्यवहारात उपयोगी पडणाऱ्या व्यक्तिमत्व विकासाच्या गोष्टीही मुली शिकल्या. आता माधुरी बारावीत आहे. पुढे शिकून ती पार्लर सुरु करण्याचा विचार गंभीरपणे करतेय.

  • 6029

-११