पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-GCCC *

फोटोशॉपची जादू भाग्यश्री भिलारे .... ....... संगणकाची जादू तिने अनुभवली आहे. सर्वोत्तम गुण मिळवून तिनं संगणक प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. आता यात अधिक शिक्षण घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचं मोठं स्वप्न ती बघतेय. ... ....... सिंदफणा किशोरी मेळावा शिरुरला झाला तेव्हा भाग्यश्री पहिल्यांदा ‘लेक लाडकी अभियाना' च्या संपर्कात आली. ते तिचं दहावीचं वर्ष होतं. पण काही तरी वेगळे अनुभवायला मिळणार म्हणून मैत्रिणीसोबत तीही या मेळाव्याला उपस्थित राहिली होती. तालुक्यात बालविवाह होतात, हे माहित होतं. पण ते थांबवण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करतंय, हे तिला खूप दिलासा देणारे होतं. मुलींना स्वावलंबी करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आणले जात आहेत आणि तेही विनाशुल्क हे समजल्यावर भाग्यश्री आणि तिच्या मैत्रिणीमध्ये उत्साहाची लाटच आली. यातले आपापल्या आवडीचे कोर्सेस निवडायचे हे सगळ्यांनी ठरवलं. तेव्हा भाग्यश्रीने फोटोशॉप निवडलं. दरम्यानच्या काळात गावातल्या अशा सेविका या मुलींना भेटल्या होत्या. त्यांनी मुलींना ‘समता' आणि 'ओळख स्वत:ची' अशी दोन पुस्तकं वाचायला दिली. ही पुस्तकं खूप वेगळा विचार करणारी आणि करायला लावणारी होती. असं काही भाग्यश्री प्रथमच वाचत होती. गावात बैठका व्हायला लागल्या. आजवर घरात मोठ्या माणसांसमोर तोंड न उघडणाऱ्या मुली मंचावर येऊन धीटपणे बोलू लागल्या. मुलींमध्ये आत्मविश्वास येऊ लागला. मुलींनी गावात राष्ट्रमाता जिजाऊ गट तयार केला. दहावीची परीक्षा संपली आणि अकरावीच्या वर्षात नोव्हेंबरमध्ये कोर्स सुरु झाला. अमोल ढाकणे सर हा कोर्स घ्यायचे. सुदैवाने घरातून भाग्यश्रीला खूप पाठिंबा आहे. कॉलेज आणि कोर्ससाठी रोज गावाहून येण्यापेक्षा शिरुरमध्येच राहणं अधिक सोपं जाणार

29 -९