________________
-GCCC
आत्मनिर्भरतेचे सुकाणू स्वाती व्हरकटे - ... .. ... गाडी चालवणं ही फक्त पुरुषांची मक्तेदारी, असा समज असलेल्या गावात राहून तिने ड्रायव्हिंगचे धडे गिरवले, यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करुन चारचाकी वाहन चालवण्याचा परवानाही मिळवला. आता तिचं स्वप्न आहे स्वत:ची गाडी घेण्याचं ! - ... ...... दोन वर्षापूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावातल्या आशा ताईंनी वर्षा देशपांडे आणि त्यांच्या लेक लाडकी अभियानाविषयी सांगितलं. त्यानंतर अभियानाचं एक पथनाट्य स्वातीला करायला मिळालं. लहान मुलीला नवरी एका समजू हे त्या पथनाट्याचं नाव. मुलीचा बालविवाह करु नका, तिला शिकवा, स्वत:च्या पायावर उभी करा. असा संदेश देणारं हे पथनाट्य स्वाती आणि तिच्या अहिल्याबाई होळकर गटाने अनेक ठिकाणी केलं. औरंगाबादमध्येही त्याचा प्रयोग झाला. वृतवाहिन्यांनी त्याची दखल घेतली. हे समाजप्रबोधन करताना गेल्या उन्हाळ्यात अभियानाने मुलींसाठी वेगवेगळे कोर्सेस आणले. त्यातला ड्रायव्हिंगचा कोर्स स्वातीला आवडला. कोर्स दोन महिन्यांचा होता आणि शाळेला सुट्टी होती. तिने रोज तासभर मनापासून वेळ दिला. एरव्ही तिने असं काही शिकायचा विचारही केला नसता. एकतर तिच्या गावात ड्रायव्हिंग ही पुरुषांची मक्तेदारी समजली जाते आणि दुसरे म्हणजे कोर्ससाठी लागणारी फी ! घरची परिस्थिती जेमतेम असल्याने एवढे पैसे उभे करणे अवघड होते. पण 'लेक लाडकी अभियाना' मुळे ही वेगळी संधी मिळाली. क्लासचा पहिला दिवस स्वातीला चांगला आठवतो. पहिल्यांदाच ती ड्रायव्हिंग सीटवर बसली होती. ब्रेक, अॅक्सलरेअर यांचा गोंधळ होत होता. क्लच दाबायला विसरायला व्हायचं. ड्रायव्हिंग व्हील कुठेही वळायचं. पण शिकवणाऱ्या काकांनी आत्मविश्वास दिला आणि स्वाती चारच दिवसात सराईतपणे गाडी चालवू लागली. महिनाभरात तर ती चांगली तरबेज झाली. तिच्याकडे आता चारचाकी गाडी चालवण्याचा
29