________________
Geec
- 2050
को जिवचा ECHIFE गाड्याचा कालावलार लागतं. त्यांच्याच एका वर्गमैत्रिणीला क्लासला जाताना एका टपोरी मुलाने छेडलं. जबरदस्तीने चिठ्ठी देण्याचा प्रयत्न केला. तिच्या आई, वडिलांनी पोलिसांत तक्रार केली. अशा घटना आजूबाजूला बऱ्याचदा घडतात. आई, वडिल ऊसतोडीला जातात. तेव्हाही भीती वाटायची ती अशाच प्रकारांमुळे पण आत गटात आल्यापासून ‘ओळख स्वत:ची' वाचल्यापासून हे प्रकार सहन करायचे नाहीत, उलट त्याविरोधात आवाज उठवायचा, हे मुलींना नीट ध्यानात आलं आहे. या दोघींच्या वर्गात मुले आहेत. पण त्यांच्याशी अभ्यास सोडला तर फार बोलणे होत नाही. खरं तर मुलांशी मैत्री करायला त्यांना आवडेल, पण गावात लोक वेगळ्या चर्चा करतात, त्यामुळे असा संवाद अद्याप तरी होत नाही. पण तो व्हायला हवा, असं मुलींना वाटतं. पुस्तकामुळे वाढत्या वयात काय खायला हवं आणि काय टाळायला हवं ते कळलं. आधी पालेभाज्या अजिबात आवडायच्या नाहीत. पण आत या भाज्यांचं महत्त्व कळलंय त्यामुळे त्या तक्रार न करता खाल्ल्या जातात. दुपारी शाळेत खिचडी भात मिळतो. तोही आवडतो. प्रज्ञा, सारिकाचे आई, वडील ऊसतोडीला जात नाहीत पण त्यांच्या अनेक मैत्रिणीचे आई-वडिल जातात. काही मुलींची आजी असते घरी. मात्र काही मुली स्वत: स्वयंपाक करतात. जसं आणि जे जमेल ते करतात आणि खातात. चांगलं, वाईट किंवा पोषक अशी निवड त्यांना नाही करता येत. प्रज्ञाला भाजी, भाकरी करता येते. संध्याकाळी सगळ्यांसाठी आठ नऊ भाकरी तीच करते ! प्रज्ञा, सारिका संध्याकाळी शाळेतून आल्या की घर झाडून स्वच्छ करतात. गोठ्याची साफसफाई करतात. पाणी भरतात, स्वयंपाकात मदत आणि नंतर अभ्यास. त्यांच्या वयाच्या सगळ्याच मुली अशी कामे करतात. वयात येताना मुलींनी घरातली सगळी कामे आलीच पाहिजेत, हे गृहीत धरलेले असते. या मुलींच्या वयाचे त्यांच्याहून मोठे भाऊ घरात असतात. ते मात्र कामाला हात लावत नाहीत. शाळेतून आले की दप्तर टाकून बाहेर खेळायला नाहीतर मित्रांसोबत मस्ती करायला बाहेर धावतात. त्यांना घरात कोणी काही काम सांगत नाही. एकाच वयाच्या भावंडांध्ये असा भेदभाव का, असा प्रश्न मुलींना पडतो. त्यांच्या वर्गात सोनाली नावाची मुलगी होती. CG
29 -२