Jump to content

पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-GCCC * आम्ही मोठ्या होतोय ..!

  • 500

प्रज्ञा बडे आणि सारिका पाखरे -... .....या दोन छोट्या चुणचुणीत मुली सोबतच्या मुलींचे बालविवाह होताना बघतात, त्यांची बदलेली आयुष्य बघताना व्याकूळ होतात. पण ही परिस्थिती बदलण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. शिकून स्वत:चे आणि आपल्या परिसरातल्या मुलींचे आयुष्य बदलून टाकायचं त्यांनी पक्क ठरवलं आहे. -... ..... प्रज्ञा बडे आणि सारिका पाखरे या शिरुरजवळच्या बडेवाडीतल्या दोघी मुली. या गावातल्या प्राथमिक शाळेत होत्या तेव्हा लेक लाडकी अभियानाचे काम त्यांच्या गावात सुरु झाले. त्या दोघी वर्गात हुशार आणि अनेक गोष्टींमध्ये रस घेणाऱ्या. त्यामुळे अभियानाच्या पथनाट्य, गाणी या उपक्रमांत त्या आघाडीवर असायच्या. गावात तेव्हा किशोरींचे दोन गट तयार झाले. थोड्या मोठ्या मुलींचा सावित्रीबाई फुले गट आणि छोट्या मुलींचा अॅड.वर्षाताई देशपांडे गट. या दोघी छोट्या गटात होत्या. गटात आल्यावर काही दिवसांनी त्यांच्या हातात 'ओळख स्वत:ची' हे पुस्तक पडलं. भरपूर रंगीत चित्रं, आकाराने मोठं, मोठ्या अक्षरांत असलेलं ते - पुस्तक मुलींना भलतंच आवडलं. त्यातली भाषाही साधी, सोपी होती. आणि विषय तर जिव्हाळ्याचा होता. आपलं शरीर नेमकं काय आहे, वयात येताना त्यात काय बदल होतात, हे अगदी सोप्या भाषेत सांगितलं होतं. हे पुस्तक शाळेतल्या पुस्तकापेक्षा वेगळं होतं. आजपर्यंत इतक्या सहज आणि सोप्या शास्त्रीय भाषेत मुलींशी घरात, शाळेत कोणीही बोललेल नव्हतं. या पुस्तकातून मुलींना स्वतः विषयी कळलं. स्वत:च्या शरीरातील बदलांविषयी कळलं आणि म्हणून ते आवडलंही. हा विषय एकदम अस्पर्श असल्यासारखा. त्यामुळे त्यावर कोणी बोलत नाही. मैत्रिणी ही कुजबुजत बोलतात आणि घरात कधीतरी आई बोलते तेही त्रोटक. त्यामुळे मुलींची या पुस्तकाशी छान मैत्री झाली. बडेवाडीवरुन मुलींना शाळेसाठी मानूरला जावं 2005)

29 -१