पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. (९९१ ) ज्ञानाचे क्षेत्र वाढते, प्रसंगावधान येते, स्वावलंबनाची संवय लागते व निरनिराळ्या लोकांच्या ओळखी होऊन पुढील आयुष्यक्रमांतील मार्ग सुलभ होतो. म्हणून प्राचीनकाळी आपल्या या पुण्यशील भरतखंडांत गुरुगृहीचा अध्ययनाचा काल संपला म्हणजे, गृहस्थाश्रम स्वीकारण्यापूर्वी तीर्थयात्रा करावी लागे. यामुळे पूर्वी जे या भरतभूमीत मोठमोठे विद्वान् व कवि होऊन गेले. त्यांनी फार प्रवास केलेला असावा. एरवीं भारत, भागवत, रामायण इत्यादि प्रचंड ग्रंथ माहितीने व विद्वत्तेने परिपूर्ण भरलेले लिहिले गेले नसते. । हल्लीं इंग्लंड वैगरे सुधारेलल्या देशांत अशी चाल आहे की, यूरोपखंडांतील प्राचीन काळी व सांप्रत काळी सुधारलेल्या देशांत प्रवास करून आल्याशिवाय शिक्षण पुरे झाले असे समजत नाहींत. म्हणून अध्ययन संपल्यावर बहुशः सर्व विद्वान् लोक यूरोपखंडांतील व शक्य तर बाहेरीलही देश पाहून येतात. कित्येक बुद्धिवान् असतात ते त्या देशांची वर्णने लिहितात, व तेथे असतांना त्या देशांतल्या भाषाही शिकतात. कित्येकांना देश निरीक्षण करण्याची आवडच असते. म्हणून ते मोठ्या शोधक बुद्धीने बाहेर प्रवासास पडतात. म्हणून त्यांची प्रवासवर्णनांची पुस्तकंही माहितीने भरलेली अशी असतात. या त्यांच्या आवडीमुळे अनेक देशांतील मोठमोठी मंदिरे, देवळे, राजवाडे, नद्या, पर्वत, सरोवरे वगैरे यांची वर्णने, फोटो व छापील चिन्ने हल्ली सर्वस सुलभ झाली आहेत. म्हणून मोठमोठ्या प्रेक्षणीय किंवा रम्य स्थळांची वर्णनें