पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९०) ऐतिहासिक देतकथा ऐकू येतील; कोठे लोकांचे खाणेपिणे, रीतिरिवाज वगैरे चमत्कारिक व्यवहार कळतील, तर कोठे सृष्टिदेवतेच्या विविध लीला दृष्टीस पडतील. मनुष्यांत तीव्र जिज्ञासा व सूक्ष्मावलोकन मात्र हवे, म्हणजे त्याला वाटेल तेथे काही तरी नवीन अवश्य हुडकून काढतां येईल. प्रवासापासून जे अनेक फायदे आहेत त्यांत विश्रांति हा एक फायदा आहे. थोडासा प्रवास केला तरी हुशारी वाटते व आपला नित्याचा व्यवसाय आपण अधिक आनंदाने व तरतरीने करू लागतो. कारण कामावर असतांना अहोरात्र कराव्या लागणाच्या चिंतेस व आपल्या शारीरिक व बौद्धिक सामथ्याच्या खर्चास थोडी तरी विश्रांति मिळते, व त्यामुळे आपले काम करण्याचे सामर्थ्य वाढते. कारण प्रवासानं संसारांतल्या दगदगीचा विसर पडतो, व श्रमल्या भागल्या शरिराला व त्रस्त झालेल्या मनाला विश्रांति मिळते. व त्यामुळे सर्वश्रम परिहार होतात. क्षणाक्षणी बदलणा-या सृष्टिसौंदर्याने मनाला आल्हाद वाटतो. प्रवासांत मुबलक मोकळ्या हवेचा पुरवठा होतो. यामुळे खाण्यापिण्याची, अंथरूण पांघुरणाची, व निजण्याबसण्याची जरी थोडशी गैरसोय भासली तरी शरिराला आराम वाटते. प्रवासाला गेल्याने निरनिराळे देश, लोक, त्यांचे वेष, भाषा, चालीरिती, हवामान इत्यादिकांचे मनोरम वैचित्र्य पाहावयास सांपडते. एकंदरीत मनाला सर्व तन्ही उत्तेजित करणारे प्रवासारखे दुसरें सुलभ औषधच नाही असे म्हटलें असतां अतिशयोक्ति होणार नाहीं. प्रवासाने मन प्रगल्भ होते, बुद्धि विकास पावत,