पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९२ ) कोणासही पुस्तकांतून वाचण्याची मोठी सोय झाली आहे. तथापि अशी स्थळे प्रत्यक्ष पाहण्यांत जो फायदा आहे, तो त वर्णने वाचून व चित्रे पाहून मनाचे समाधान करणे म्हणजे दुधाची तहान ताकावर भागविण्यासारखेच आहे. अशी स्थळे प्रत्यक्ष पाहिल्याने मनावर एकप्रकारचा उदात्त व टिकाऊ परिणाम होतो. तो वर्णने वाचल्यानें अगर चित्रे पाहिल्याने होत नाही. लोकांचे स्वतः निरीक्षण केल्याने जो एकप्रकारचा फायदा होता तो पुस्तके वाचून होत नाहीं, आपला गांव, प्रांत व देश सोडून दुस-या गांवांत, परकीय प्रांतांत अगर परदेशांत कांहीं दिवस प्रवास करणे यांतच एकप्रकारचे शिक्षण आहे. अशा प्रवासांत निरनिराळ्या प्रांतांतील लोकांच्या सामाजिक किंवा औद्योगिक स्थितीचे लक्षपूर्वक अवलोकन केले तर त्यामुळे आपल्या विचारास एकप्रकारचे चांगले वळण लागते. | आतां प्रवासाच्या पूर्व तयारी संबंधाने थोडेसे सांगतो. आपल्या गांवाहून दहावीस कोस दूर असलेल्या गांवास कांही दिवस राहावयास जावयाचे असेल तर आपल्याला किती तरी तयारी करावी लागते, हे सर्वीस माहीत आहेच. मग शंकडों मैलांवर, जेथे आपली ओळख ना पाळख, ना धर्म ना गोत अशा प्रकारच्या व आपल्याहून भिन्न रीतिरिवाजाच्या देशास प्रवासास जातांना शक्य तितकी कडेकोट तयारी करून गेले पाहिजे हे उघड आहे. लांबचा प्रवास करावयाचा असला म्हणजे काय घेऊ, काय नको असे होते, व.मन अगदीं गोंधळून जाते. एकदां पुष्कळ घ्यावेसे वाटते, पण दगदगीचा प्रश्न पुढे उभा राहिला कीं कांहींही घेऊ नये