पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८९ ) उत्कृष्ट ग्रहणशक्ति आणि निरनिराळ्या ठिकाणच्या लोकांचे स्वभाव ओळखण्याची तारतम्यबुद्ध इत्यादि गुण अवश्य असले पाहिजेत. प्रवास म्हणजे केवळ एक करमणुकीचे साधन एवढाच विचार करून जो प्रवास करील त्याला प्रवासापासून करमणुकीपेक्षा जास्त फायदा होणार नाहीं, हे उघड आहे. | मनुष्यांत चातुर्य येण्याला प्रवास अवश्य आहे हैं। कोणाही कबूल करील. परंतु नुसते देशाटन केल्याने मनुष्य चतुर होईलच होईल असे मात्र म्हणतां येणार नाहीं. चातुर्य येण्यासाठी देशाटन हे एक केवळ साधन । आहे. त्याचा जर योग्य उपयोग करून घेतला नाहीं तर विशेष फायदा होणार नाही. कारण असे जर नसते तर सर्व पृथ्वीवर भटकणारे खलाशी, देशोदेशीं एंजिनापाठीमागे बसून त्याबरोबर धावणारे एंजिनड्रायव्हर, आसेतुहिमाचल म्हणजे सेतूपासून हिमालय पर्वतापर्यंत जा ये करणारे भाविक यात्रेकरू, सर्व तीर्थे हिंडणारे श्रद्धाळू वगैरे सर्व लोक चतुरच चतुर बनले असते. पण अनुभव कांहीं तसा नाही. याचे कारण त्या लोकांना या साधनाचा हवा तसा उपयोग करून घेता येत नाहीं, अगर ते करीत नाहीत, हेच हाय. प्रवासांत किंवा नित्य व्यवहारांत देखील मनुष्याने आपले कान व डोळे उघडे ठेविले व जिज्ञासा जागृत ठेविली तर तो चतुर झाल्याखेरीज राहात नाहीं. कारण बहुतेक ठिकाण, रानांत वनांत, खेड्यापाड्यांत, शहरांत, कसब्यांत, कांहींना तरी नवीन शिकण्यासारखे अवश्य आढळेल. कोठे ऐतिहासिक लेख सांपडतील. कोठे