पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४८) (११)प्रवास.

  • यो न संचरते देशान् यो न सेवेत पंण्डितान् ।। तस्य संकुचिता बुद्धि घृतबिंदुरिवाम्भसि ॥ १ ॥ यस्तु संचरते देशान् यस्तु सेवेत पंडितान् ॥ तस्य विस्तारिता बुद्धिस्तैलाबिंदुरिवाम्भसि ॥ २ ॥

भावार्थः–जो अनेक देशांत फिरत नाहीं, किंवा जो विद्वानांशी सहवास करीत नाही, त्याची बुद्धि पाण्यांत तुपाचा बिंदु जसा संकुचित होतो, त्याप्रमाण संकुचित असते. ( १ ) - जो अनेक देशांत फिरतो, व विद्वानांचा सहवास करितो, त्याची बुद्धि, पाण्यांत तेलाचा बिंदु जसा विस्तृत होतो, त्याप्रमाणे विस्तार पावते. ( २ ) प्रवास करणे हा एक शिक्षणाचाच भाग आहे. कारण प्रवासाने ज्ञानाची वृद्धि होते. मनुष्य स्वभावाचे अध्ययन करण्याला तर प्रवासासारखे दुसरे सुलभ साधन नाहीं. पुस्तकांच्या सहाय्याने घरी बसल्या बसल्या अनेक प्रकारचे ज्ञान मिळविता येते. कारण चांगला पुस्तकसंग्रह म्हणजे एक विश्वविद्यालयच होय, ही गोष्ट जरी खरी आहे, तथापि सृष्टिदेवतेच्या अफाट ग्रंथाचे निरीक्षण प्रवासामध्ये करणे याच्यासारखी ज्ञानार्जनाची सुलभ सुखकर व मनोवेधक अशी दुसरी पद्धत नाही म्हटले तरी चालेल. मात्र प्रवासाच्याद्वारे ज्ञान प्राप्त करून घेण्यास मनुष्याच्या अंगीं उत्तम चैौकस बुद्धि, तीव्र निरीक्षणशाक्त,