पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८७ ) कां देता येत नाहींत ह्याचीच फिकीर मी करीत असे. प्रत्येक प्रकरणाची उपपात्त बरोबर समजल्यावर, त्या प्रकरणांतील प्रश्न सोडविता आलेच पाहिजेत. तरच त्यांत मौज आहे, व त्यांतच मनाचे खरें समाधान आहे. केवळ वर नंबर आणण्याकरितां ज्यांची धडपड असे, ते दुसन्यास विचारून किंवा ज्यांत प्रश्न सोडविले आहेत अशा पुस्तकांत पाहून तयारी करीत असत, मला ही गोष्ट मुळींच पसंत नसे. त्यामुळे मला जेव्हा एखादा प्रश्न अडे, तेव्हां तो मी तसाच वहींत टिपून ठेवीत असे. व फुरसतीच्या वेळी, जेव्हां मन सुप्रसन्न असेल, तेव्हां तो प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत असे. यामुळे जेवढा विषय मी सोपपत्तिक शिकलो, तेवढा माझे मनांत पक्का बिंबला, स्वतःच्या परिश्रमाने शिकलेल्या कोणत्याही गोष्टीचे असेच आहे. स्वतः मेहनत घेऊन श्लोक लावणे व भाषांतराची पुस्तके वांचून किंवा कोणीं कांहीं टिपणे केली असतील, ती पाहून श्लोक लावणे ह्यांत पुष्कळ अंतर आहे. दुस-याच्या साह्याने संपादन केलेले ज्ञान तात्पुरते असते, परंतु आपल्या परिश्रमाने मिळविलेले ज्ञान दीर्घकाळपर्यंत टिकते.