पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| ( ८४ ) कर्ज देऊन टाकण्यासाठी शेवटी त्याने आपल्या जमिनीपैकी अर्थी जमीन विकून टाकली. व बाकीची अर्धी त्याने हंबीरराव या नांवाच्या शेतक-याला खंडाने दिली. | हंबीरराव हा मेहनती व हुषार मनुष्य होता. तो दररोज शेतांत जाई, आणि एका नोकराच्या मदतीने ती जमीन स्वतः नांगरी. तीत तो चांगले खत घाली व चांगले बी पेरी. तीत तो जे पीक काढी तें, तो जितका खंड देत असे त्याच्या पांच सहा पट किंमतीचे असे. त्या शेतक-याने आपला बहुतेक पैसा शिलकेस पाडला. कारण त्याच्या गरजा फारच थोड्या होत्या. तो स्वतः करितां फारच थोडा पैसा खर्च करी. तो अगदी साध्या राहणीने रहात असे. एके दिवशी सकाळीं ख़ुशीलराव हा आपल्या तट्टावर बसून खंडाने दिलेल्या शेतांजवळून जात होता. तेव्हा हंबीरराव हा त्याच्याजवळ गेला व मोठ्या नम्रतेने म्हणला, * महाराज, हे शेत आपण विकणार आहात, असे मी ऐकले आहे. जर तसे असेल तर मी आनंदाने ते विकत घेईन. दुसरे जी किंमत देतील तितकी मी आपणास देईन. मला आपण हे शेत द्या. ' तो जमिनदार आश्चर्याने त्यास म्हणाला ** तू मज पासून जी जमीन खंडाने घेतली आहेस, तिच्या दुप्पट जमिनीचा मी मालक होते. मला खंड द्यावा लागत नसे. तथापि मला कर्ज झाले व माझी अर्धी जमीन गेली. तुझ्याकडे फक्त हल्ली निम्मी जमीन आहे. तू मला खंड देतोस, तरी देखील ही जमीन विकत घेण्याइतकी शिल्लक