Jump to content

पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८३ ) पडणारे दुसरें साधन नाही. प्रत्येक मनुष्य जर, आपल्यावर आलेली अडचणरूपीं कांटेरी झुडपें स्वतःच बाजूस सारून त्यांतून काढलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करील, तर, पुढे पुढे जातां जातां तो एक उत्तम अनुभावक, आणि शहाणा मनुष्य झाल्यावांचून राहणार नाहीं. करितां श्री तुकाराम महाराज सांगतात की:- | आपुलिया बळे बांधव ती कास । धरूं नये अस कोणाचीही ॥

    • या * व ** जा ' यांमधील फरक

| ॐ एकदां एका गांवांत खुशालराव या नांवाचा एक जमीनदार रहात असे. त्याच्या बापाने राजाची चांगली नोकरी बजाविली होती; म्हणून त्याने त्याला एक मोठी जमीन इनाम करून दिली होती. खुशालराव हा एक मूर्ख व निष्काळजी तरुण मनुष्य होता. त्या जमिनीची मशागत करण्यासाठी त्याने मजुरी देऊन नोकर ठेविले होते. पण तो त्याचेवर कधीही देखरेख करीत नसे. तो घरीं आळसांत वेळ घालवी, त्याच्या वापाने त्याला पुष्कळ पैसाही मिळवून ठेविला होता. तो त्याने लवकरच चैनीत उधळुन टाकला. चार वर्षांचे आंतच तो कर्ज बाजारी झाला. ज्या सावकाराचे त्याने कर्ज काढिले होते त्याने त्यास इतका मान दिला कीं तें