पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८२ ) जाऊन थंडीमुळे एकेठिकाणी जमतो व पिकांवर तंबूप्रमाणे आच्छादन करतो. व त्या योगाने पिकांचे धुक्यापासून संरक्षण होते. पिकांची पैदास अधिक व्हावी म्हणून त्यांची सारखी खटपट सुरू असते. प्रत्येक मक्याच्या ताटाला । पुष्कळ कणसे लागावीत असा त्यांचा प्रयत्न चालू असतो. त्याचप्रमाणे गायी म्हशींनी पुष्कळ दूध द्यावे म्हणून ते बहुत प्रयत्न करतात. व त्यांच्या त्या प्रयत्नास यश । येऊन घागरीच्या घागरी भरून दूध देणा-या गाईम्हशा तिकडे पुष्कळ असतात. हे सर्व कशाचें फळ म्हणाल तर ५ वावलंबनाचे होय. मनुष्य कोठेही असे, त्याची स्थिति कांहीही असो, त्याने आपले काम आपण स्वतः करावे. त्याविषयीं दुसव्याच्या भरवशावर कधीही राहं नये. कारण कोणी झाला तरी त्याला स्वतःचे म्हणून काहींना कांहीं तरी काम असतेच. आपले काम एकीकडे ठेवून दुसन्याचे काम हाती घेणारी माणसे फार विरळा असतात. म्हणून आपले काम आपण जातीने केले पाहिजे. आधी आपण कंबर बाधावा, आणि मग जरूर तर दुसन्यास साह्यास बोलवावे. कामावर “या म्हणावें, “जा म्हणू नये. प्रसंग विशेषीं दुसरे लोक आपणास मदत करू शकतील; पण आपणांस सर्व भार स्वतः वरच ठेविला पाहिजे. कारण, आपले हित अनहित जसं आपणांस कळते तसे ते दुसन्यास कळत नाही. आपणांस अनुकूल असलेल्या गोष्टींचा पूर्ण उपयोग करून घेणे झाल्यास स्वावलंबनच अंगिकारिले पाहिजे. कारण त्यासारखे प्रसंगी उपयोगी ।